Sidharth Malhotra and Kiara Advani : भांगेत कुंकू, हातात चूडा, गळ्यात मंगळसूत्र..., सासरी पोहोचली कियारा, असं झालं स्वागत By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 10:09 AM1 / 10कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नानंतर ज्या फोटोंची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ते फोटो समोर आलेत आहेत.2 / 10लग्नानंतर पहिल्यांदा नवविवाहित जोडपं मीडियासमोर आलं. या नववधू व वराला पाहून चाहते जणू क्रेझी झालेत. 3 / 10कियारा व सिद्धार्थ काल रात्री दिल्लीला पोहोचले. लाल रंगात नववधू व वर दोघांनी पापाराझींना मस्तपैकी हसत पोझ दिल्यात. 4 / 10लग्नानंतर पहिल्यांदा कियारा सासरी पोहोचली. सासरी तिचं जंगी स्वागत झालं. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.5 / 10लाल रंगाचा सलवार सूट, भांगेत कुंकू, हातात चूडा, गळ्यात मंगळसूत्र, मोकळे केस आणि चेहऱ्यावर न मावणारा आनंद अशा थाटात नववधू कियाराची दिल्ली विमानतळावर एन्ट्री झाली.6 / 10सिद्धार्थही लाल रंगाचाच कुर्ता, पायजामा आणि त्यावर फ्लोरल स्कार्फ अशा अवतारात राजबिंडा दिसत होता.7 / 10एअरपोर्टवर दोघांनी पापाराझींना मिठाई वाटून आनंद साजरा केला. आज दिल्लीत कियारा व सिद्धार्थचं रिसेप्शन होणार आहे.8 / 10७ फेब्रुवारीला सिद्धार्थ व कियाराने राजस्थानातील जैसलमेर येथे लग्नगाठ बांधली. बॉलिवूड इंडस्ट्रीचे काही मोजेके मंडळी या लग्नाला हजर होते.9 / 10सिद्धार्थ-कियाराच्या शाही लग्नसोहळ्यावर तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.10 / 10आज ९ फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा त्याचे सर्व नातेवाईक, जवळचे मित्र आणि इतर सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications