22 वर्षांनी मोठ्या कमल हसनच्या प्रेमात होती 'ही' अभिनेत्री, नुकतंच बॉलिवूडमध्ये केलं कमबॅक By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 3:32 PM1 / 9मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर यांचा 'गुलमोहर' हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेत्री सिमरनने (Simran Bagga)) लक्ष वेधलं. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पण तुम्हाला माहितीए का एकेकाळी सिमरन कमल हसन (Kamal Hassan) यांच्या प्रेमात वेडी होती.2 / 9सिमरनचं खरं नाव ऋषिबाला नवल आहे. नुकताच तिने ४७ वा वाढदिवस साजरा केला. तिला दोन लहान बहिणी देखील आहेत. मोनल आणि ज्योती अशी त्यांची नावं. मोनल साऊथ इंडस्ट्रीत अभिनेत्री आहे.3 / 9सिमरनने 1995 साली 'सनम हरजाई' फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा पहिलाच भारतीय सिनेमा होता ज्याचे शूटिंग न्यूझिलंडमध्ये झाले.4 / 9सिमरनची लव्हलाईफ खूपच साधी राहिली आहे. लहानपणीचा मित्र दीपक बग्गा यांच्यासोबत तिने 2 डिसेंबर 2003 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलंही आहेत.5 / 9याशिवाय सिमरनने डीडी मेट्रो वरील एका गाण्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं आहे. याच कार्यक्रमात जया बच्चन यांनी सिमरनला नोटीस केले आणि तिला 'तेरे मेरे सपने' मध्ये भूमिका दिली.6 / 9सिमरनच्या टॅलेंटची बॉलिवूडने दखल घेतली नाही. म्हणूनच तिने साऊथमध्ये काम करायला सुरुवात केले. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा अनेक भाषात तिने काम केले.तिला अनेक अवॉर्ड्सनेही सम्मानित करण्यात आले.7 / 92000 साली सिमरन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली. 22 वर्षांनी मोठ्या सुपरस्टार कमल हसन बरोबर तिचं अफेअर सुरु असल्याची ही चर्चा होती. दोघांनी एका सिनेमात एकत्र काम केले तेव्हापासून ही चर्चा सुरु झाली होती. 8 / 9चित्रीकरणाशिवाय सिमरन आणि कमल हसन इतर वेळीही एकमेकांना भेटायचे. त्यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त नातं होतं. जेव्हा जेव्हा कमल हसन यांच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होते तेव्हा सिमरनचं नाव येतंच.9 / 9असं म्हणतात की सिनेमाचं शूट संपल्यानंतर दोघांमधील नातंही संपलं. हळूहळू ही चर्चाही थांबली. मात्र कमल हसन यांच्या आयुष्यातील लव्हअफेअर्समध्ये सिमरनचंही नाव घेतलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications