Join us

आयुष्यात अनेक वादळं आली पण त्या पुन्हा उभ्या राहिल्या, गायिका अनुराधा पौडवाल यांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 4:15 PM

1 / 7
हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) आज 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'अभिमान' सिनेमात जया भादुरी यांच्यासाठी त्यांनी श्लोक गात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर प्रत्येक सिनेमात अनुराधा यांचं गाणं असायचंच.
2 / 7
यानंतर अनुराधा पौडवाल यांना टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची साथ मिळाली. नंतर त्यांचं करिअर बहरलं. आशिकी, दिल है की मानता नही, बेटा सारख्या अनेक सिनेमात त्यांनी गाणी गायली. त्यांना सलग तीन फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले.
3 / 7
यानंतर अनुराधा यांना अनेक निर्मात्यांनी त्याच्या सिनेमासाठी ऑफर दिली. मात्र अनुराधा यांनी फक्त टी सिरीजसोबतच काम करणार असं जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयामुळे अनुराधा आणि गुलशन कुमार यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.
4 / 7
पण अनुराधा यांच्यासाठी तो दिवस धक्कादायक होता जेव्हा गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबईतील जीतनगर मधील एका मंदिरासमोर त्यांची हत्या झाली. त्यावेळी अनुराधा पूर्णपणे खचल्या होत्या.
5 / 7
गुलशन कुमार यांचे सहाय्यक अरुण पौडवाल यांच्याशी अनुराधा यांचे लग्न झाले होते. मात्र 1991 साली त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर अनुराधा यांनी दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ केला. आदित्य पौडवाल आणि कविता पौडवाल अशी त्यांची नावं आहेत.
6 / 7
इतकंच नाही तर त्यांच्या आयुष्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. २०२० साली त्यांचा मुलगा आदित्यचं ३५ व्या वर्षी किडनीच्या आजाराने निधन झालं. तेव्हा त्या अक्षरश: कोसळल्या होत्या.
7 / 7
अनुराधा आणि अलका याज्ञिक इंडस्ट्रीतील तेव्हाच्या लोकप्रिय गायिका. मात्र दोघींमध्ये एका कारणाने बिनसलं आणि त्यांच्यात कधीच सुलह झाली नाही. माधुरी दीक्षितसाठी अलका यांनी गायलेली दोन गाणी पुन्हा अनुराधा यांच्याकडून गाऊन घेण्यात आली होती. यानंतर अलका यांनी २ वर्ष कामच केलं नव्हतं.
टॅग्स :अनुराधा पौडवालगुलशन कुमार बॉलिवूड