हिमेश रेशमियाने रोमँटिक अंदाजात केले लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, ही अभिनेत्री आहे त्याची पत्नी By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 5:22 PM1 / 8हिमेश रेशमिया आणि सोनिया कपूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.2 / 8हिमेश आणि सोनियाच्या लग्नाला दोन वर्ष झाले असून त्यांनी खास अंदाजात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.3 / 8लॉकडाऊनमुळे हिमेश आणि सोनिया यांना कुठेही बाहेर जाता न आल्याने त्यांनी घरातच त्यांच्या लग्नाला वाढदिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा केला. 4 / 8हिमेशचे हे दुसरे लग्न आहे. हिमेश आणि सोनियाच्या अफेअरची चर्चा अनेक वर्षं मीडियात होत असली तरी त्यांनी त्यांचे नाते कधीच स्वीकारले नव्हते. त्यांनी मे २०१८ ला अचानक लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी धुमधडाक्यात लग्न न करता कोर्ट मॅरेज करणे पसंत केले होते.5 / 8हिमेशने सोनियासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यासोबत आय लव्ह यू असे लिहिले आहे. सोनिया ही अभिनेत्री असून तिने कुसूम, जुगनी लगी जलंधर, कुमकुम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.6 / 8हिमेशने सोनियासोबत लग्न करण्यासाठी त्याची पहिली पत्नी कोमलला लग्नाच्या २२ वर्षानंतर घटस्फोट दिला. हिमेश आणि कोमलला स्वयम नावाचा मुलगादेखील आहे.7 / 8२००६ पासून हिमेश आणि सोनियाच्या अफेयरची मीडियात चर्चा सुरू होती. पहिले चार वर्षे तर हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रीण’ अशीच करून दिली होती. पण काही काळाने त्यांच्या नात्याविषयी त्याच्या घरातल्यांना कळले. त्यामुळे कुटुंबियांच्या विरोधामुळे काही काळासाठी ते दोघे एकमेकांपासून दूर राहिले. परंतु हिमेशच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले.8 / 8हिमेश अनेकवेळा पार्टी, फिल्मी स्क्रिनिंगला सोनियासोबत आवर्जून हजेरी लावतो. आणखी वाचा Subscribe to Notifications