आलिशान गाड्या ते लक्झरी लाईफस्टाईल; जाणून घ्या दिवसाकाठी लाखो कमावणाऱ्या जुबिन नौटियालचं Networth By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 12:45 PM1 / 11आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला भुरळ घालणारा लोकप्रिय गायक म्हणजे जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal).2 / 11उत्तम स्वरसाज लाभलेला जुबिन त्याच्या प्रोफेशनल लाईफसह वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर कायम त्याच्या नावाची चर्चा रंगतांना दिसते.3 / 11आजवरच्या कारकिर्दीत जुबिनने अनेक गाजलेली गाणी गायली आहेत. परंतु, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या शेहशाह चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत आला.4 / 11जुबिन आज लोकप्रिय गायक असल्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच त्याच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊयात.5 / 11शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या जुबिनने येथेच त्याचं करिअर घडवलं. सलमान खानच्या बजरंगी भाईजान, द हम्मा सॉन्ग या गाण्यांना आवाज देऊन तो प्रकाशझोतात आला.6 / 11सध्याच्या काळात सर्वाधिक कमाई करणारा गायक म्हणून जुबिनकडे पाहिलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार, जुबिन एका गाण्यासाठी ५ ते ७ लाख रुपये मानधन घेतो.7 / 11जुबिनला आलिशान गाड्यांची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे त्याच्याकडे व्हॉल्वो एक्ससी90, लेम्बोर्गिनी अवेंटाडोर, रोल्स रॉयस फँटम आणि बीएमडब्ल्यू एक्स9 या गाड्या आहेत.8 / 11जुबिन एका कॉन्सर्टसाठी ५० ते ६० लाख रुपये फी चार्ज करतो. त्यामुळे महिन्याला तो साधारणपणे ६६ ते ७० लाखांची कमाई करतो.9 / 11जुबिन युट्यूब, कॉन्सर्ट शो, चित्रपट आणि म्युझिक अल्बम यांच्यातूनही कमाई करतो.10 / 11सूत्रांच्या माहितीनुसार, जुबिन नौटियालचं नेटवर्थ १६ मिलिअन डॉलर इतकं आहे. त्यामुळे भारतीय चलनानुसार, तो १२० कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.11 / 11बॉलिवूडसह त्याने तेलुगू, तामिळ, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. तसंच काही इंग्लिश वेबसीरिजसाठीही त्याने गाणी म्हटली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications