लैंगिक शोषणाची बळी ठरली होती नेहा भसीन, घटना आठवून आजही होते अस्वस्थ By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 6:00 AM1 / 10 इंडस्ट्रीत तिने आपले स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. नेहा भसीन आता चर्चेत येण्यास एक वेगळेच कारण समोर आले आहे. 2 / 10दिवसेंदिवस आपण लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचत असतो. अभिनय क्षेत्रात काम करत असताना अनेक कलाकारांनीही या विषयी अनेकदा वाचा फोडली आहे. 3 / 10या विषयावर पूर्वी इतके मनमोकळेपणाने बोलले जायचे नाही. मात्र आता अनेकजण त्यांना आलेल्या विचित्र अनुभवाविषयी उघडपणे बोलतात. 4 / 10नेहा भसीननेही या विषयी दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादाक खुलासा केला आहे. 5 / 10 अवघ्या 10व्या वर्षी नेहाला लैंगिक शोषणाचा सामना कराला लागला होता. 6 / 10 लहानपणी हरिद्वार याठिकाणी गेली असता तिच्यासोबत असा प्रसंग घडला असल्याचे तिने म्हटले आहे. 7 / 10आजही त्या घटना आठवताच अस्वस्थ व्हायला होते. 8 / 10 एका मुलीसाठी या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मात्र मला माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. 9 / 10हाच विश्वास मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कायम मदत करतो. कधीही मला आत्मविश्वास ढळतो असं वाटतं त्यावेळी मी मनःशांती, ध्यान करते आणि लिखाणही करते. त्यामुळे मला लिहायलाही खूप आवडतं. 10 / 10दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात असे काही लोक आहेत की त्यांच्याकडे पाहून आपुसकच प्रेरणा मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications