Freida Pinto : 'स्लमडॉग मिलिनिअर' च्या अभिनेत्रीचा खुलासा, प्रेग्नंसीनंतर आलं डिप्रेशन; "एका कोपऱ्यात..." By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 10:38 AM1 / 8हॉलिवूड अभिनेत्री फ्रीडा पिंटो (Freida Pinto)आठवतेय का? 'स्लमडॉग मिलिनिअर' या सुपरहिट सिनेमात तिने भूमिका साकारली होती. मुंबईत लहानाची मोठी झालेली फ्रीडा मोजक्याच सिनेमांमध्ये दिसली. 'स्लमडॉग मिलिनिअर'मधील तिचा सहकलाकार अभिनेता देव पटेलसोबत तिच्या अफेअरच्या चरचा रंगल्या. मात्र 2014 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.2 / 8फ्रीडाने 2020 मध्ये कोरी ट्रॅनशी लग्न केले. सध्या ती लॉस एंजिलिस येथे राहते. फ्रीडाने 2021 मध्ये मुलाला जन्म दिला. रुमी असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. पहिल्या प्रेग्नंसीनंतर फ्रीडा डिप्रेशनमध्ये गेल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.3 / 8२ वर्षांपूर्वी फ्रीडा एका मुलाची आई झाली. मात्र यानंतर तिचं आयुष्यच बदललं कारण तिला पोस्टपार्टम डिप्रेशनने ग्रासलं. यामध्ये नक्की काय होतं आणि फ्रीडाने याचा कसा सामना केला हे तिने सांगितलं आहे. 4 / 8catt sadler च्या it sure is a beautiful day या पॉडकास्टमध्ये फ्रीडा म्हणाली, 'रुमीला जन्म दिल्यानंतर तीन महिने खूप छान गेले. मात्र त्यानंतर मला अस्वस्थता, बैचेनी, घाबरणे, डिप्रेशन आणि एकटं वाटणे अशा अडचणी येऊ लागल्या.5 / 8'चौथ्या महिन्यात जेव्हा मी लॉस एंजिलिस येथे परत आले तेव्हा मला काम करायचीही इच्छा नव्हती. मला पूर्णवेळ फक्त बाळाकडे लक्ष द्यायचं होतं. मला आतल्या आत भीती, एंक्झायटी जाणवू लागली. मी नक्की केलंय काय असं मला वाटायला लागलं.'6 / 8'माझा मुलगा सतत रडत होता. चिडचिड करत होता. मी त्याला बघत एका कोपऱ्यात बसून रडायचे. मला घरी एकटं एकटं वाटायला लागलं होतं. माझे आईवडिलही भारतात परत गेले होते. जेव्हा माझ्या नवऱ्याने माझी ही परिस्थिती पाहिली तेव्हा त्याने मला थेरपिस्टची मदत घेण्यास सांगितलं.'7 / 8मी काय विचार करतेय, मला काय म्हणायचंय हे सगळं त्याने मला थेरपिस्टला सांगायला सांगितलं. मला पुरेशा झोपेची गरज होती. मात्र त्याऐवजी मी गोष्टी नीट करण्यात व्यस्त असायचे. म्हणून मी थकून जायचे. मला त्याचं म्हणणं पटलं.'8 / 8'मी थेरपिस्टकडे गेले आणि माझे सेशन सुरु झाले. भीती वाटणं स्वाभाविक आहे. इतर आजारांप्रमाणेच ही एक सामान्य बाब आहे. माझी परिस्थिती खूपच वाईट होती पण थेरपीनंतर मी खूश राहायला लागले. आता मी आनंदी राहायला लागले आहे त्यामुळे माझं कुटुंबही आनंदी आहे.' आणखी वाचा Subscribe to Notifications