1 / 8मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) आगामी 'बलोच' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. स्मिता पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार असून प्रविण तरडेसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली आहे. 2 / 8'पप्पी दे पारुला' या गाण्यामुळे आणि बिग बॉसमुळे स्मिता घराघरात पोहोचली. स्मिता लहानपणापासूनच ज्युडो, कराटेमध्ये पारंगत आहे. तिने त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. तर बलोच सिनेमात तिने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. लहानपणापासूनच शिक्षण घेतल्याने तिला हे सीन्स देणं सोप्पं गेलं.3 / 8स्मिताने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत लहानपणी कधी मारामारी केली आहे का या प्रश्नावर एक किस्सा सांगितला. 4 / 8ती म्हणाली,'मी एकेकाळी खूप मारामारी करायचे आणि विशेषकरुन मुलांनाच मारायचे. मी राष्ट्रीय स्तरावर ज्युडो खेळायचे. माझ्या भावाने मला सांगितलं होतं की पोटाच्या वरचा असा भाग असतो ज्याठिकाणी जर बुक्की बसली बरोबर तर माणूस खाली पडेल. मग तुझा ज्युडो वगरे काही नाही.'5 / 8स्मिता पुढे म्हणाली,'मला तो प्रयोग करुन बघायचा होता. मी वाटच बघत होते की कोणीतरी काहीतरी येऊन मला बोला रे मला मारुन बघायचंय.मी सातवी आठवीत असेन माझ्या रिक्षातला मुलगा ज्याला मी रोज बघते तो मला काहीतरी बोलला आणि मला संधी मिळाली. मी अशी त्याची गचांगडी पकडली आणि धपकन मारलं.'6 / 8पुढे नंतर नववीत असताना एक मुलगा माझ्या वर्गाबाहेर येऊन बसायचा आणि माझ्याकडेच टक लावून बघत बसायचा. मला फार इरिटेट झालं. म्हटलं काय रे तुझे क्लास आहेत का इकडे असं म्हणून मी त्याची गचांडी पकडली आणि ज्युडोचा तो थ्रो ट्राय केला असं स्मिता म्हणाली.7 / 8बलोच सिनेमात स्मिता आणि प्रविण तरडे यांच्यावर रोमँटिक गाणंही शूट करण्यात आलंय ज्याची बरीच चर्चा आहे. हे गाणं करताना स्मितानेच आपल्याला सांभाळून घेतल्याचं प्रविण तरडे म्हणाले होते.8 / 8स्मिता खऱ्या आयुष्यात अतिशय हॉट आहे. तिने अनेक बिकीनी अवताराताील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर बलोच मध्या मात्र अगदी उलट पारंपारिक वेशभुषेत ती बघायला मिळत आहे.