नाकात नथ, कपाळी चंद्र कोरच डिझायनर साडीत स्मिता शेवाळेचं क्लासी फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 4:56 PM1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्मिता मराठी कलाविश्वात सक्रीय आहे.2 / 9काही दिवसांपूर्वीच स्मिताने तिचं हक्काचं घर खरेदी केलं. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.3 / 9स्मिताने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.4 / 9स्मिता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.5 / 9कॉफी कलरच्या डिझायनर साडीत स्मिताने तिचं फोटोशूट केलं आहे. या साडीत ती ग्लॅमरस दिसत आहे.6 / 9स्मिताने अनेक हिंदी, मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच ती दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार या सिनेमात झळकली होती. 7 / 9सुभेदार या सिनेमात तिने तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. 8 / 9'यंदा कर्तव्य आहे', 'अथांग', 'कनिका', 'चल लव्ह कर', 'दम असेल तर', 'धामधूम', 'लाडी गोडी', 'वन रूम किचन', 'विठ्ठला', 'चारचौघी', 'मांडला दोन घडीचा डाव', 'वीर शिवाजी', 'मुरांबा' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 9 / 9स्मिताला एक मुलगा असून कबीर असं त्याच नाव आहे. स्मिता अनेकदा तिच्या लेकासोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications