कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट; स्नेहा वाघ म्हणाली, "आता रिलेशनशिपची भीती वाटते..." By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 2:55 PM1 / 8मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघला (Sneha Wagh) कोण ओळखत नाही? सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने मनोरंजनसृष्टीत वेगळं स्थान मिळवलं. स्नेहा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2 / 8मराठी थिएटर, मालिकांमधून स्नेहाने करिअरला सुरुवात केली. वयाच्या १३ व्या वर्षी 'अधुरी एक कहाणी' मालिकेत ती झळकली. 'काटा रुते कुणाला' ही तिची हाजलेली मालिका. यानंतर तिने हिंदीत झेप घेतली. तिची पहिलीच 'ज्योती' मालिका हिट ठरली. बिग बूॉस मराठी सीझन 3 मध्येही ती सहभागी झाली होती.3 / 8नुकतीच स्नेहा दोन मालिकांमध्ये दिसली. 'नीरजा' आणि 'ना उम्र की सीमा हो' मालिकेत तिने भूमिका साकारली. यानंतर ती अद्याप टीव्हीवर दिसलेली नाही. 4 / 8स्नेहा वाघला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात ती एकटी आहे. तिचे दोन घटस्फोट झाले. प्रेम, लग्न यावरचा विश्वासच उडाल्याचं तिने सांगितलं.5 / 8टेली टॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'आता मला पुन्हा प्रेमात रस नाही. मी रिलेशनशिपसाठी बनलेलीच नाही. स्वत:सोबतच आनंदी राहण्याची सवय लागली आहे. मला आयुष्यात कधीच एकटेपणा वाटत नाही. 6 / 8'स्वत:सोबत राहण्यात वेगळाच आनंद मिळतो. नवीन नवीन गोष्टी मी शिकते, ऑनलाईन काही ना काही वाचते. माझं मन काहीतरी नवीन करण्याकडे वळतं. खरं सांगायचं तर रिलेशनशिप म्हणजे मला ट्रॉमाच वाटायला लागलाय. मला रिलेशनशिपमध्ये यायची भीतीच वाटते.'7 / 8'आपापलं काम करा, आईवडील भाऊ-बहीण यांच्यासोबत छान राहा, कमवा , खर्च करा हेच माझं आयुष्य आहे. पण आता मला आयुष्यात रिलेशनशिप परत नकोय.' स्नेहा काही महिन्यांपूर्वीच वृंदावन ला जाऊन आली. ती आता आध्यात्माकडे वळल्याचंही तिने मुलाखतीत सांगितलं.8 / 8स्नेहा खूप कमी वयाची असताना म्हणजे १९ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली होती. अविष्कार दार्वेकरसह तिने लग्न केले. मात्र ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली. यानंतर तिने 2015 साली अनुराग सोळंकी सोबत दुसरे लग्न केले. अनराग इंटिरियर डिझायनर आहे. मात्र हे लग्नही केवळ आठ महिनेच टिकलं. आणखी वाचा Subscribe to Notifications