social media star imanvi ismail who work with prabhas upcoming movie fauji
एक रील व्हायरल झालं अन् थेट प्रभाससोबत सिनेमात झळकण्याची संधी! कोण आहे ही सोशल मीडिया स्टार? By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 5:05 PM1 / 7सध्या सोशल मीडिया स्टारला सिनेमात काम करण्याची मोठी संधी मिळतेय. अशीच एक सुवर्णसंधी मिळाली सोशल मीडिया स्टार असलेल्या इमानवीला.2 / 7इमानवीचे इन्स्टाग्रामवर ९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. इमानवीला हैद्राबादमध्ये फौजी सिनेमाच्या मुहुर्त शॉटला बघायला मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या3 / 7इमानवी इस्माईल ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आता प्रभाससोबत फौजी सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे. सोशल मीडियामुळे इमानवीला ही मोठी संधी मिळाली4 / 7इमानवी ही सुप्रसिद्ध नृत्यांगना असून तिच्या डान्स रील्सला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळाली. याशिवाय तिच्या रील्सला सुद्धा मीलियनच्या घरात व्ह्यूज असतात5 / 7फौजी मध्ये इमानवी प्रभाससोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. इमानवीने सिनेमाच्या मुहुर्त पूजेला प्रभास आणि सिनेमाच्या इतर टीमसोबत फोटोशूट केलं6 / 7फौजी सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा दिसणार असून इमानवी आणि प्रभासची नवी जोडी प्रेक्षकांना कशी पसंत पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे7 / 7सातत्याने रील करत राहिल्याने एखाद्याचं नशीब कसं चमकू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इमानवी. इमानवी सिनेमात बघायला तिचे फॉलोवर्स उत्सुक असतील यात शंका नाही आणखी वाचा Subscribe to Notifications