कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 1:08 PM1 / 11बॉलिवूडमधील अभिनेत्री बऱ्याचदा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट करताना दिसतात. अभिनेत्री आपला लूक ग्लॅमरस बनवण्यासाठी लिप सर्जरी, बोटोक्स, नाक आणि ओठांची सर्जरी करताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी सर्जरी केली आणि ट्रोल झाल्या.2 / 11रिमी सेनने ओठांची सर्जरी केली असून तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अभिनेत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. अभिनेत्री म्हणाली की तिने ओठांची शस्त्रक्रिया केलेली नाही. तिने बोटॉक्स आणि लिप फिलर केले आहेत.3 / 11 अनुष्का शर्माने लिप फिलर आणि जॉलाइन टाइट केली होती. या अभिनेत्रीला तिच्या बदललेल्या लूकमुळे खूप ट्रोल करण्यात आले. लोकांनी तिला बदकाच्या ओठांचा टॅग दिला होता.4 / 11सुंदर दिसण्यासाठी आयशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली होती. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीचा चेहरा विद्रूप झाला होता. त्यामुळे या अभिनेत्रीला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले.5 / 11उर्फी जावेदने लिप फिलर केले होते. लिप फिलरमुळे चेहरा सुजला असल्याचे अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर सांगितले होते. लिप फिलर आणि बोटॉक्ससह उर्फीचा फोटो व्हायरल झाला होता.6 / 11प्रियांका चोप्राने ओठांवर शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीचा चेहरा विद्रूप झाला. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीने घराबाहेर पडणे बंद केले होते.7 / 11राखी सावंतने अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. अभिनेत्रीनेही तिच्या मुलाखतीत हे मान्य केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीचा लूक खूप बदलला आहे.8 / 11सोफिया हयातचीही शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. जरी अभिनेत्री म्हणाली होती की तिला ट्रोलर्सची पर्वा नाही9 / 11मिनिषा लांबाचे ओठ पातळ होते. ओठ वाढवण्यासाठी अभिनेत्रीने ओठांची शस्त्रक्रिया केली होती. मात्र या शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा विद्रूप झाला.10 / 11बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने सुंदर दिसण्यासाठी ओठ आणि नाकाची शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीच्या चेहऱ्यात बराच बदल झाल्याचे दिसून आले.11 / 11अभिनेत्री कोयना मित्राने प्लास्टिक सर्जरी केली. तिने नाकाची सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे कोयनाचा चेहरा आणखी खराब झाला. कधीकाळी कोयनाकडे अभिनयासह काही आयटम नंबर होते, मात्र सर्जरीनंतर दिग्दर्शकांनी कोयनाकडे पाठ फिरवली. कोयनाला या सर्जरीमुळे काम मिळणं बंद झालं. आणखी वाचा Subscribe to Notifications