Join us

In Pics: कधी ब्रेकअपमुळे तर कधी ट्रोलिंगला कंटाळून या स्टार्सनी सोशल मीडियावरून घेतला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 3:33 PM

1 / 9
सोनाक्षी -आग लगे बस्ती मे, मै अपने मस्ती मे. बाय ट्विटर, असे म्हणत सोनाक्षीने अलीकडे ट्विटरला रामराम ठोकला. ट्विटरवर या दिवसांत प्रचंड नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे मी माझे अकाऊंट डिअ‍ॅक्टिवेट करत आहे. बाय, पीस आऊट, असे तिने ट्विटर डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यापूर्वीच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते.
2 / 9
आयुष शर्मा - 280 कॅरेक्टर्स कुठल्याही व्यक्तिचे वर्णन करण्यात अपुरे आहेत. पण 280 कॅरेक्टर्स फेक न्यूज, द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यासाठी पुरेसे आहेत. या मानसिकेसाठी साईन अप केले नव्हते. खुदा हाफिज, असे लिहित आयुषने ट्विटर सोडले होते.
3 / 9
जहीर इक्बाल- सलमान खानने लॉन्च केलेल्या आणि नोटबुक या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या जहीर इक्बालने अलविदा ट्विटर म्हणत ट्विटरला रामराम ठोकला आहे.
4 / 9
चाहत खन्ना - लॉकडाऊन काळात चाहत खन्ना व मिका सिंगने एक म्युझिक व्हिडीओ बनवला होता. या म्युझिक व्हिडीओच्या प्रॅक्टिसदरम्यानचे काही फोटो चाहतने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर मिका व चाहत यांचे नाव जोडले गेले होते. यामुळे संतापून चाहतने स्वत:चे इन्स्टा अकाऊंटच डिलीट केले होते.
5 / 9
अंकिता लोखंडे- अंकिता सोाल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. मात्र सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ती प्रचंड खचली आहे. सुशांतने 14 जूनला आत्महत्या केली. तेव्हापासून अंकिताने एकही पोस्ट केलेली नाही.
6 / 9
जय सोनी - जयने गतवर्षी सोशल मीडियावरून ब्रेक घेता होता. त्याने स्वत:चे सर्व फोटो डिलीट केले होते.
7 / 9
आशा नेगी - रित्विक धनजानी व आशा नेगीच्या बे्रकअपच्या बातम्या काही दिवसांपूर्वी चर्चेत होत्या. यानंतर आशा नेगीने 1 आठवड्यांसाठी सोशल मीडियावरून बे्रक घेतला होता.
8 / 9
एरिका फर्नांडिस - एरिकाने तिच्या वाढदिवसाच्या आधी सोशल मीडिया डिटॉक्स केला होता.
9 / 9
नेहा कक्कर - सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेकांनी काही लोकांना ट्रोल करणे सुरु केले. या निगेटीव्ह वातावरणाला कंटाळून सिंगर नेहा कक्करने सोशल मीडियापासून दूर जाणे पसंत केले होते.
टॅग्स :सोशल मीडियाबॉलिवूडसोनाक्षी सिन्हाटेलिव्हिजन