Join us  

असा मस्त दणक्यात साजरा झाला सोनाली कुलकर्णीचा पहिला दिवाळसण..., पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 12:05 PM

1 / 8
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी यंदाच कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतरचा पहिला दिवाळसण मात्र दोघांनीही पुण्यात साजरा केला.(सर्व फोटो- सोनालीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून)
2 / 8
पहिल्या दिवाळसणाचा उत्साह न्याराच असतो. सोनालीचा पहिला दिवाळसण दणक्यात साजरा झाला.
3 / 8
दिवाळीच्या दिवशी लाल-केशरी साडी,मोकळे केस, हातावर मेहंदी असा तिचा थाट होता. नवºयासोबत सोनालीने अनेक रोमॅन्टिक पोज दिल्यात.
4 / 8
पाडव्याच्या दिवशीही सोनाली मस्तपैकी सजरी. नृत्यकला, चित्रकला आणि आकाशी रंगाची साडी अशा सर्व आवडत्या गोष्टींचा मेळ जमून आला.
5 / 8
आकाशी रंगाच्या साडीत सोनाली प्रचंड सुंदर दिसत होती. त्यामुळे पाडवाही दणक्यात साजरा झाला.
6 / 8
पाडव्याच्या दिवशी सोनाली व तिचा पती कुणाल दोघेही मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले.
7 / 8
सोनालीने भाऊबीजही थाटात साजरी केली. भाऊ अतुल कुलकर्णीसोबत तिनं मस्तपैकी पोज दिल्यात.
8 / 8
भाऊबीजेच्या दिवशीही तिचा थाट बघण्यासारखा होता. गुलाबी साडी, नाकात नथ असा तिचा लुक होता. एकंदर काय तर पहिल्या दिवाळसणाला सोनालीने धम्माल मज्जामस्ती केली.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी