Join us  

सोनालीने कुणालपूर्वी केलंय 'या' व्यक्तीला डेट; ५ वर्षांचं रिलेशन तोडत संपवलं नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:33 AM

1 / 9
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
2 / 9
आज सोनाली महाराष्ट्राची अप्सरा या नावानेही ओळखली जाते. पुण्याजवळ असलेल्या खडकी येथे सोनाली लहानाची मोठी झाली.
3 / 9
मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या सोनालीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते.
4 / 9
सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या एक्स बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे.
5 / 9
सोनालीने दुबईस्थित कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे. मात्र, त्यापूर्वी ती एका व्यक्तीच्या प्रेमात होती.
6 / 9
कॉलेजमध्ये असताना सोनाली एका सिनिअरच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे या मुलाला सोनालीने स्वत: प्रपोज केलं होतं.
7 / 9
जवळपास ५ वर्ष सोनालीने या मुलाला डेट केलं. मात्र, पुढे परस्पर सामंजस्याने त्यांनी ब्रेकअप केला आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
8 / 9
सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. त्यानंतर पहिल्यांदा केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिने मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं.
9 / 9
सोनालीने आजवर 'नटरंग', 'अजिंठा', 'क्षणभर विश्रांती', 'हंपी', पांडू अशा कित्येक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन