Join us  

Sonalee Kulkarniनं नवीन वर्षात दिली गुड न्यूज!, चाहते करताहेत अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 12:53 PM

1 / 11
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सर म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 11
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 11
सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते.
4 / 11
दरम्यान सोनाली कुलकर्णीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
5 / 11
सोनाली कुलकर्णीने नवीन वर्षांच्या सुरुवातीला चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
6 / 11
तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. तर तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं आहे.
7 / 11
सोनाली कुलकर्णी साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. खुद्द तिनेच हे सोशल मीडियावर सांगितले आहे.
8 / 11
सोनाली कुलकर्णीने चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितले आहे.
9 / 11
या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सोनाली म्हणाली की, 'नवीन वर्ष... नवीन प्रवास...नवीन प्रदेश... @lijo_lebowski च्या #malayalam चित्रपट #malaikottaivaaliban मध्ये दिग्गज @mohanlal सर सोबत काम करताना माझे नवीन वर्ष खरोखरच आशादायक वाटत आहे.'
10 / 11
सोनालीची ही पोस्ट पाहून चाहते तसेच तिचे सहकलाकार अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
11 / 11
सोनाली कुलकर्णीला आता मल्याळम चित्रपटात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी