Join us

सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याला पाहिलंय का? नक्की काय काम करतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:20 IST

1 / 12
बॉलिवूडची 'हम साथ साथ हैं'मधील 'प्रीती' म्हणजेच सोनाली ब्रेंदे (Sonali Bendre). ९०च्या दशकापासून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
2 / 12
मराठमोळ्या सोनालीचा जगभरात चाहतावर्ग आहे. सहज अभिनय आणि लोभस हास्य ही तिची खासियत आहे.
3 / 12
वयाची पन्नाशी गाठून, एवढं आजारपण झेलूनही तिचं सौंदर्य अबाधित आहे.
4 / 12
आजही सोनालीचे लाखो चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात.
5 / 12
नुकतंच सोनाली २७ फेब्रुवारी रोजी मनसेनं आयोजित केलेल्या अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रमात सहभागी झाली होती.
6 / 12
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि सोनाली बेंद्रे यांची खूप जुनी मैत्री आहे. जवळपास ३० वर्षानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची पुन्हा भेट (Raj Thackeray Sonali Bendre Spotted Together) झाली.
7 / 12
या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा खिळल्या त्या सोनाली बेंद्रेकडे. सगळीकडे सध्या सोनालीच चर्चा रंगली आहे.
8 / 12
सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुर असतात. सोनालीचे पती काय करतात, असे प्रश्न कायम चाहत्यांना पडत असतात.
9 / 12
तर सोनालीच्या नवऱ्याचं नाव गोल्डी बेहल असं आहे. सोनाली आणि गोल्डीने २००२ मध्ये लग्न केलं होतं. गोल्डी आणि सोनाली यांची लव्हस्टोरीही (Sonali Bendre and husband Goldie Behl love story) खूप भन्नाट आहे.
10 / 12
एका सिनेमाच्या सेटवर गोल्डी बेहल यांनी सोनालीला पाहिलं होतं आणि पाहताक्षणी ते तिच्या प्रेमात पडले.
11 / 12
त्यांनी तिच्याशी फर्ल्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सोनालीने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यानंतर 'अंगारे' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग प्रेम झालं.
12 / 12
गोल्डी बेहल हे दिग्दर्शक रमेश बेहल यांचे सुपूत्र आहेत. गोल्डी आणि सोनाली यांना रणवीर हा एक मुलगादेखील आहे.
टॅग्स :सोनाली बेंद्रेराज ठाकरेबॉलिवूड