इंजिनिअरिंग करत असताना पडला प्रेमात, अशी आहे सोनू सूद आणि त्याच्या पत्नीची लव्हस्टोरी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 7:41 PM1 / 9सोनू सूद कोरोनाच्या काळात देवदूत बनला आहे. त्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस अनेकांची घरी जाण्याची व्यवस्था केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधं, इंजेक्शन, ऑक्सिजन यांचा पुरवठा सर्वसामान्यांना करताना तो दिसत आहे. 2 / 9सोनू सूद चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी तो आता खऱ्या आयुष्यात नायक बनला आहे. 3 / 9सोनूची पत्नी सोनाली कमालीची सुंदर आहे. पण ती सुद्धा कॅमे-यांपासून स्वत:ला दूर ठेवणे पसंत करते.4 / 9सोनू सूदने 25 सप्टेंबर 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. खास बात म्हणजे, सोनालीचा फिल्मी इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. सोनू इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली होती. पुढे सोनू व सोनाली एकमेकांत इतके गुंतले की, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.5 / 9सोनू पंजाबी आहे तर सोनाली तेलगू आहे. सोनाली माझ्या आयुष्यात येणारी पहिली आणि अखेरची मुलगी आहे, असे तो अनेक मुलाखतींमध्ये सांगतो.6 / 9सोनूच्या संघर्षाच्या काळात सोनाली नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली.7 / 9लग्नानंतर दोघेह मुंबईत एका 1 बीएचके फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेत. हा फ्लॅट सोनू व सोनाली अन्य तीन लोकांसोबत शेअर करत. पण सोनालीने याबाबत कधीही तक्रार केली नाही.8 / 91999 मध्ये सोनूने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तामिळ चित्रपट ‘कल्लाजहगर’मधून त्याने अॅक्टिंग डेब्यू केला.9 / 92002 मध्ये त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘शहीद-ए-आजम’ रिलीज झाला. परंतू त्याला खरी ओळख मिळाली ती ‘युवा’मधून. यानंतर कहां हो तुम, शीशा, आशिक बनाया आपने, जोधा अकबर, एक विवाह ऐसा भी, दबंग, बुड्ढा होगा तेरा बाप, मैक्सिमम, रमैया वस्तावैया, आर...राजकुमार आणि हैप्पी न्यू ईयर यासारख्या चित्रपटांत झळकला. आणखी वाचा Subscribe to Notifications