फक्त ५ हजार घेऊन मुंबईत आला, आज आहे करोडपती; गरिबांचा दिलदार सुपरहिरो माहितीय का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:07 PM1 / 10बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीत विशेष ठसा उमटवला आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की, जेव्हा या अभिनेत्याने मुंबईत पाऊल ठेवलं तेव्हा त्याच्या खिशात फक्त पाच हजार रुपये होते. 2 / 10आज सोनू आलिशान घर, अनेक गाड्या आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक झाला आहे. सोनू सूदने ‘शहीद-ए-आझम’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 3 / 10२००२ मध्ये अभिनेत्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर, अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.4 / 10सोनू सूदने केवळ हिंदीतच नाही तर दक्षिणेतील अनेक चित्रपटांत देखील काम केलं आहे. तो केवळ पाच हजार रुपये घेऊन मुंबईत आला होता आणि आता त्याच्या मेहनतीच्या जोरावर आज कोट्यवधींचा मालक झाला आहे. 5 / 10सोनू सूदची नेट वर्थ आज जवळपास १३५ ते १४० कोटी रुपये आहे. अभिनेता फक्त चित्रपटातूनच नव्हे तर जाहिराती आणि रिॲलिटी शोमधून देखील मोठी कमाई करतो.6 / 10सोनू सूदचे मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला भागात आलिशान घर आहे. ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहेत.7 / 10या अभिनेत्याला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. पोर्शे पॅनामेरा आणि मर्सिडीज बेंझ एमएल-क्लास सारख्या आलिशान गाड्या त्याच्याकडे आहेत.8 / 10अभिनेता एका चित्रपटासाठी सुमारे दोन ते तीन कोटी रुपये घेतो. सोनू सूद लवकरच 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे.9 / 10सोनू सूदने कोरोनाच्या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. 10 / 10लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications