Join us

'सूर्यवंशम'मधील भानुप्रतापचा नातू आता काय करतो? १२ वर्षांनी 'या' सिनेमातून केलं कमबॅक

By देवेंद्र जाधव | Updated: April 16, 2025 14:57 IST

1 / 7
'सूर्यवंशम' सिनेमा पाहिला नाही असा एकही माणूस आढळणार नाही. 'सूर्यवंशम' सिनेमा आजही सेट मॅक्सवर दर रविवारी आवर्जुन पाहिला जातो.
2 / 7
'सूर्यवंशम' सिनेमात ठाकूर भानुप्रताप यांच्या नातवाची भूमिकाही चांगलीच गाजली. बालकलाकार आनंद वर्धनने ही भूमिका साकारली होती.
3 / 7
आनंदला या एका सिनेमातून खूप लोकप्रियता मिळाली. आजोबांना खीर देणारा निरागस नातू म्हणून आजही आनंद वर्धनला ओळखलं जातं.
4 / 7
आनंद वर्धन या सिनेमानंतर अभिनयक्षेत्रात इतका दिसला नाही. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं. पण आता १२ वर्षांनी आनंद पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक करतोय.
5 / 7
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निदुरिंचु जहापाना' या तेलुगू चित्रपटात आनंदने मुख्य भूमिका साकारली. आनंदच्या या रोमँटिक सिनेमाचं चांगलंच कौतुक झालं.
6 / 7
२००४ नंतर आनंदने अभिनयातून विश्रांती घेतली. त्याने हैदराबाद येथील CMR College of Engineering & Technology, हैदराबाद येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंगमध्ये B.Tech चं शिक्षण पूर्ण केलं.​
7 / 7
​'सूर्यवंशम' या १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अर्थात आनंदने साकारलेली 'सोनू'ची भूमिका खूप गाजली.
टॅग्स :अमिताभ बच्चनसूर्यवंशीTollywoodबॉलिवूड