So Pretty! पिवळ्या फ्लोरल साडीत अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य; वयाच्या चाळीशीतही दिसते लाजवाब By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 4:29 PM1 / 8काजलने हिंदी, तमिळ तसेच तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 2 / 8२००४ मध्ये आलेल्या 'क्यू हो गया' या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही. 3 / 8२०१० मध्ये आलेल्या 'सिंघम' या चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेता अजय देवगनसोबत काजलने पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. 4 / 8या चित्रपटानेही त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पाहायला गेल्यास काजलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. 5 / 8काजल सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्याद्वारे वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत काजल नेहमीच तिच्याबाबतीत महत्वाचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.6 / 8अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो पोस्ट केलेत. 7 / 8पिवळ्या रंगाची फ्लोरल साडी परिधान करून तिने हे फोटोशूट केलंय. तसेच या लूकला साजेसे रत्नजडित दागिने तिने घातले आहेत. अभिनेत्री या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसतेय. 8 / 8काजलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने उद्योगपती गौतम किचलू यांच्यासोबत लग्न केलं. तिला एक गोंडस मुलगा देखील आहे, ज्याचं नाव नील आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications