Join us

फक्त तीनच सिनेमे केले, बॉलिवूडचा सर्वात बुटका अभिनेता! २२०० कोटींची कमाई, तुम्हाला माहितीये का?

By देवेंद्र जाधव | Updated: April 17, 2025 17:06 IST

1 / 7
हा अभिनेता अवघ्या काही सिनेमांमध्ये अभिनय करुन आज सर्वांचा लाडका अभिनेता झालाय. बॉलिवूडपासून साउथ इंडस्ट्रीपर्यंत त्याचा डंका आहे.
2 / 7
या अभिनेत्याचं नाव जाफर सादिक. जाफर केवळ२५ वर्षांचा असून तो सध्या संपूर्ण इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहे.
3 / 7
जाफर सादिकने ‘विक्रम’, ‘जिगर ठाकुर’ आणि ‘विदुथलाई’ या चित्रपटांतून अपार लोकप्रियता मिळवली. जाफरच्या भूमिकांचं खूूप कौतुक झालं.
4 / 7
याशिवाय जाफरने २०२३ साली आलेल्या शाहरुखच्या जवान सिनेमात जाफरने अभिनय केलाय. शाहरुख आणि जाफरचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता.
5 / 7
जाफरने अभिनय क्षेत्राला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही वर्षांत दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
6 / 7
विक्रम, जेलर आणि जवान या तिन्ही ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये जाफरने काम केलं होतं. या तिन्ही सिनेमांची एकूण कमाई २२०० कोटींच्या वर जाते.
7 / 7
जाफरची उंची फक्त ४ फूट ८ इंच इतकी आहे. परंतु मूर्ती लहान किर्ती महान ही म्हण जाफरसाठी समर्पक आहे. जाफरने अभिनयाची उंची गाठली आहे.
टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडTollywood