Join us

खुशबू सुंदर यांचं घटलेलं वजन पाहून चाहते शॉक, पार चेहरामोहराच बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:37 IST

1 / 11
दाक्षिणात्य अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर (Kushboo Sundar) सध्या चर्चेत आल्या आहेत.
2 / 11
त्या बरेच वजन कमी केल्याने ( Kushboo Sundar's Weight Loss) त्या अगदी स्लिम ट्रिम झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे त्याच्या या वेटलॉसची बरीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळतेय.
3 / 11
खुशबू यांनी वयाच्या ५४ वर्षी ९ महिन्यांत सुमारे २० किलो वजन कमी केले आहे. खुशबू यांनी वजन घटवले तरी कसे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
4 / 11
नुकतंच त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये त्या प्रचंड सुंंदर दिसत आहेत.
5 / 11
'Back to the Future' असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलं आहे. त्याचप्रमाणे #goodhealth, #GlamourSlam सारखे हॅशटॅगही वापरले आहेत.
6 / 11
खुशबू यांचं सौंदर्य आणि फिटनेस तरूणींनाही लाजवले असं आहे. अनेकांनी त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक केले आहे.
7 / 11
खुशबू सुंदर यांचा ग्लॅमरस लुक पाहून त्यांना ओळखणं कठीण झालं आहे.
8 / 11
खुशबू यांचा वजन कमी करण्याचा प्रवास २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान सुरू झाला होता. तेव्हा त्याचं वजन ९३ किलो होतं.
9 / 11
५४ व्या वर्षी २० किलो वजन कमी करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी हे सिद्ध करुन दाखवलं की वयापेक्षा मानसिकता महत्त्वाची असते.
10 / 11
खुशबू यांनी वजन कमी करण्यासाठी कुठल्या औषधांचा वापर करत तर केला नाही ना, अशी शंका काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
11 / 11
नेटकऱ्यांच्या शकांचे समाधान करणारी पोस्ट चित्रपट दिग्दर्शक आनंद कुमार यांनी शेअर केली. खुशबू सुंदर यांच्या फिटनेसच्या प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी म्हटलं, 'हे एक अविश्वसनीय परिवर्तन आहे. कोरोनाकाळापासून मी तुला कठोर परिश्रम करताना पाहिलं आहे. दररोज १०,००० ते १५,००० पावलं चालणं तुझ्या दिनचर्येचं एक भाग बनलं. तु रिअल हिरो आहेस. हा प्रवास सुरू ठेवं आणि इतरांना प्रेरणा देत राहा!', असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले.
टॅग्स :सेलिब्रिटीवेट लॉस टिप्स