'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 6:09 PM1 / 11२०२१ साली प्रदर्शित झालेला 'पुष्पा' सिनेमा प्रचंड गाजला. याचा पुढचा भाग 'पुष्पा २' येत्या ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 2 / 11'पुष्पा'ने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. या सिनेमातील डायलॉग प्रचंड व्हायरल झाले होते. तर अल्लू अर्जुनची पुष्पा स्टाइलही प्रेक्षकांना भावली होती. 3 / 11'पुष्पा'मुळे अल्लू अर्जुन प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमासाठी त्याला नॅशनल अवॉर्डही मिळाला. पण, अल्लू अर्जुन 'पुष्पा'साठी पहिली पसंत नव्हता. 4 / 11सिनेमातील पुष्पा ही भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शक सुकुमारला साऊथ सुपरस्टार महेश बाबू हवा होता. 'पुष्पा'साठी महेश बाबूला विचारणाही झाली होती. 5 / 11मात्र, पुष्पासारखी भूमिका साकारण्यात महेश बाबूला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे त्याने या भूमिकेला स्पष्ट नकार दिला. 6 / 11महेश बाबूने नकार दिल्यामुळे अल्लू अर्जुनला या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि त्यानंतर 'पुष्पा'च्या भूमिकेतून अभिनेत्याने सगळ्यांच्याच मनावर छाप सोडली. 7 / 11पुष्पाबरोबरच सिनेमातील श्रीवल्लीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. रश्मिका मंदानाच्या आधी या भूमिकेसाठी समांथाला विचारण्यात आलं होतं. 8 / 11जर समांथाने होकार दिला असता तर 'पुष्पा' सिनेमात आयटम साँगऐवजी ती श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसली असती.9 / 11पण, समांथाला ग्रामीण भागातील मुलीची व्यक्तिरेखा करण्यात रुची नव्हती आणि म्हणूनच तिने श्रीवल्लीला नकार दिला. 10 / 11'पुष्पा' सिनेमात फहाद फासिलने SP भंवर सिंगची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठीदेखील दिग्दर्शकाला विजय सेतुपती हवा होता. 11 / 11मात्र, विजय सेतुपतीच्या बिझी शेड्युलमुळे ही भूमिका फहादकडे आली. आणखी वाचा Subscribe to Notifications