थिएटरनंतर ओटीटीवर ७ महिन्यांपासून ट्रेंडिंगमध्येच आहे 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट, तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:17 IST
1 / 10काही चित्रपट असतात, जे बॉक्स ऑफिसवर तर ब्लॉकबास्टर ठरतातच, पण ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही धमाल घालतात. सध्या असाच एक चित्रपट आहे, ज्याची चर्चा सुरू आहे. 2 / 10ज्यानं बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई तर केलीच पण, ओटीटीवरही प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. हा चित्रपट गेल्या सात महिन्यांपासून ओटीटीवर टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? तर तो चित्रपट कोणता आहे, हे जाणून घेऊया.3 / 10ज्या सिनेमाची सात महिन्यानंतरही क्रेझ कमी झालेली नाही, जो चित्रपट आहे 'आवेशम' (Aavasham). प्रेक्षक हा सिनेमा पुन्हा-पुन्हा पाहत आहेत. चित्रपटाची लोकप्रियता इतकी आहे की त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.4 / 10मल्याळम चित्रपट 'आवेशम' हा ११ एप्रिल २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तर OTT वर 9 मेच्या दरम्यान आला होता. या चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली. 5 / 10चित्रपटाच्या कथेपासून ते कलाकारांपर्यंत, प्रत्येकाने प्रेक्षकांवर स्वतःची वेगळी छाप सोडली. हा एक उत्तम अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे बजेट फक्त ५० कोटी रुपये होते. 6 / 10'अवेशम' या चित्रपटात फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहे, ज्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. कॉलेज गँगवार ते अस्सल गँगवार, जबदस्त ॲक्शन्स, कॉमेडी असा हा सिनेमा आहे. 7 / 10या चित्रपटाची कथा बंगळुरूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची आहे. कॉलेजमध्ये वरिष्ठांशी त्यांचे भांडण होते आणि त्यांना कंटाळून ते तिघेही बदला घेण्याची योजना आखतात आणि यासाठी ते स्थानिक गुंड रंगा (फहाद फासिल) कडे मदतीसाठी जातात.8 / 10येथून पुढे, त्याच्या आयुष्यात एक मोठा बदल येतो आणि सर्व काही बदलून जातं. हा चित्रपट गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून हा चित्रपट ट्रेंडिंग लिस्टमधून बाहेर पडण्याचे नाव घेत नाही.9 / 10या चित्रपटाची कथा इतकी अद्भुत आहे की एकदा पाहिल्यानंतर तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. हा चित्रपट तुम्हाला अजिबात कंटाळा येऊ देत नाही.10 / 10जर तुम्ही हा चित्रपट अद्याप पाहिला नसेल तर तुम्ही तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.