"...तर यामुळे होणाऱ्या मृत्यूंची जबाबदारी तू घेणार का?"; माजी बॅडमिंटनपटूने सामंथाला फटकारले By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 5:06 PM1 / 7दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सामंथान सोशल मीडियावर नेब्युलायझरसह स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्याद्वारे तिने डॉक्टरांच्या उपचार पद्धतींबद्दल माहिती दिली होती. मात्र आता याचवरुन तिच्यावर टीका करण्यात येत आहेत.2 / 7सामंथाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, सायरियाक एबी फिलिप्स उर्फ 'द लिव्हर डॉक्टर' या डॉक्टरने तिच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता प्रसिद्ध माजी बॅटमिंटनपटूने सामंथाला फटकारलं आहे.3 / 7अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने नुकतीच आरोग्याशी संबंधित एक पोस्ट पोस्ट केली होती, ज्यामध्ये तिने व्हायरल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड कसे वापरावे हे सांगितले होते. मात्र यामुळे सामंथा लोकांच्या निशाण्यावर आली आहे. 4 / 7एका डॉक्टरने सामंथा अशिक्षित असल्याचे सांगून तिला तुरुंगात पाठवण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे आता बॅडमिंटनपटू आणि तमिळ चित्रपट अभिनेता विष्णू विशालची पत्नी ज्वाला गुट्टा हिने सामंथावर निशाणा साधला आहे.5 / 7सामंथाने सुचवलेल्या आरोग्यविषय सल्ल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल ज्वाला गु्ट्टाने विचारला आहे.6 / 7मोठ्या संख्येनं चाहते फॉलोअर्स असलेल्या आणि लोकांना वेगवेगळे औषधोपचार लिहून देणाऱ्या अभिनेत्रीला माझा एकच प्रश्न आहे. या गोष्टींचा सकारात्मक परिणाम नाही झाला आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर तुम्ही याची जबाबदारी घेणार का? तुम्ही ज्या डॉक्टरला टॅग केलं आहे तो या मृत्यूची जबाबदारी घेईल का? असं ज्वाला गुट्टाने म्हटलं.7 / 7डॉक्टरांच्या पोस्टनंतर सामंथाने सांगितले होते की, 'मी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकारची औषधे घेत आहे. माझ्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने घेतल्या. मला सल्ला देणारे लोक खूप पात्र होते आणि त्यांनी त्यावर संशोधनही केले आहे.' आणखी वाचा Subscribe to Notifications