Join us

"किस देशील का?" लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकलमधला 'तो' भयावह प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:47 IST

1 / 10
सध्या देशभरात महिला सुरक्षिततेची चर्चा पाहायला मिळत आहे. महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळत आहे. फक्त सामान्य महिलाच नाही तर अगदी सेलिब्रिटीही कधी ना कधी या घटनांना सामोऱ्या गेल्या आहेत. अशात आता एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे.
2 / 10
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मालविका मोहनन (Malavika Mohanan) आहे. मालविका मोहनन हिने नुकतंच 'हॉटरफ्लाय'शी बोलताना तिच्यासोबत मुंबई लोकलमध्ये घडलेला भयानक प्रसंग (Malavika Mohanan Discusses Safety Concerns In Mumbai) सांगितला.
3 / 10
मालविका मोहननचा लोकल ट्रेनमध्ये विनयभंग झाला होता. मालविका म्हणाली, 'आज मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात सुरक्षित वाटतं, कारण माझ्याकडं स्वतःची कार आणि ड्रायव्हर आहे. परंतु प्रत्येक महिलेच्या बाबतीत असं नसतं. लोक अनेकदा म्हणतात की, मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे, पण मी त्यांचा दृष्टिकोन बदलू इच्छिते. आज माझ्याकडे स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर आहे. म्हणून जर कोणी मला विचारलं की, मुंबई सुरक्षित आहे का, तर मी हो म्हणेन. पण सगळेच सुरक्षित नाहीत'.
4 / 10
याच मुलाखतीमध्ये मालविका मोहनन हिनं तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मुंबई लोकलमध्ये तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. मालविका म्हणाली, 'मला आठवतंय एकदा मी आणि माझ्या दोन जवळच्या मैत्रिणींनीसोबत लोकल ट्रेनने प्रवास करत होते. मला वाटतं रात्रीचे ९.३० वाजले होते आणि आम्ही पहिल्या डब्ब्यात बसलो होतो. त्यामुळे तो डबा अगदी रिकामा होता. आमच्या तिघींशिवाय बोगीत कोणीही नव्हतं. आम्ही खिडकीच्या ग्रिलजवळ बसलो होतो. आम्हा तीन मुलींना बसलेलं पाहताच एक माणूस ग्रिलच्या अगदी जवळ आला. त्याने ग्रिलवर आपला चेहरा टेकवला आणि म्हणाला, 'मला एक किस देशील का?'
5 / 10
पुढे ती म्हणाली, 'ते ऐकताच आम्हा तिघींनाही धक्का बसला. त्या वयात, अशा परिस्थितीत, कशी प्रतिक्रिया द्यायची? हे सुद्धा आम्हाला समजलं नाही? जर तो ट्रेनमध्ये चढला असता आणि काही केलं तर ? ही फक्त एक घटना आहे. मला वाटतं सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेकडे छळ आणि छेडछाडीच्या अशा असंख्य कहाण्या असतील'.
6 / 10
मालविका मोहनन हिनं प्रामुख्याने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिनेमॅटोग्राफर केयू मोहनन यांची ती मुलगी आहे.
7 / 10
तिचा जन्म केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर शहरात झाला आणि ती मुंबईत वाढली. मालविकाने मुंबईतील विल्सन कॉलेजमधून मास मीडियामध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
8 / 10
एकदा ती वडिलांसोबत मामूटी अभिनीत फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीच्या शूटिंगला गेली होती. त्यावेळी मामूटीने मालविकाला अभिनयात रस आहे का याबद्दल विचारलं. त्यानंतर तिला त्याचा मुलगा दुल्कर सलमान याच्यासोबत एका आगामी मल्याळम चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर दिली.
9 / 10
मालविकानं दुल्कर सलमान पट्टम पोल या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मालविकानं बियॉन्ड द क्लाउड्स, द ग्रेट फादर , पेट्टा आणि मास्टर या हिट दाक्षिणात्य चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
10 / 10
मालविका मोहनन प्रभाससोबत आगामी तेलगु चित्रपट 'द राजा साब'मध्ये पाहायला मिळणार आहे. हा हॉरर-कॉमेडी १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि नवीन रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodप्रभासमुंबईमुंबई लोकलमहिला