Join us

'पुष्पा २' फेम फहाद फासिलची बायकोही आहे अभिनेत्री, २०२४ मधील 'या' गाजलेल्या सिनेमात केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:12 IST

1 / 7
फहाद फासिलने अलीकडेच 'पुष्पा २'मध्ये भंवर सिंग शेखावत या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. फहाद फासिलची बायकोही लोकप्रिय अभिनेत्री आहे
2 / 7
फहाद फासिलच्या बायकोचं नाव आहे नजरिया नाजिम. नजरियाही लोकप्रिय अभिनेत्री आहे
3 / 7
नजरिया आणि फहाद या दोघांनी 'ट्रान्स' या सिनेमात काम केलं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज असून ही जोडी अनेकांची फेव्हरेट आहे
4 / 7
नजरियाने २०२४ मध्ये 'सूक्ष्मदर्शिनी' या सिनेमात काम केलं. हा सिनेमा सध्या ओटीटीवर रिलीज झाला असून चांगलाच गाजतोय
5 / 7
नजरिया आणि फहाद या दोघांचा एकमेकांच्या करिअरला सपोर्ट आहे. दोघांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
6 / 7
२०१४ मध्ये आलेल्या 'बँगलोर डेज' या सिनेमात फहाद फासिल आणि नजरिया या दोघांनी एकत्र काम केलेलं. या सिनेमाच्या सेटवरच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली
7 / 7
२०१४ मध्ये दोघांनी लग्न केलं असून त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघेही मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत