काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 12:46 PM1 / 10साऊथमधील आघाडीचा अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu). एकेकाळी ही साऊथमधली लोकप्रिय जोडी होती. २०१७ मध्ये हे क्युट कपल लग्नबंधनात अडकलं. मात्र २०२१ मध्ये त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला.2 / 10समंथा आणि नागा चाहत्यांमध्ये चाय आणि सॅम नावाने ओळखले जातात. 'chaysam' असं त्यांचं हॅशटॅग नेहमीच खूप व्हायरल होतं. ऑक्टोबर २०१७ मध्ये नागा आणि समंथा यांचं ग्रँड वेडिंग पार पडलं. अगदील स्वप्नवत वाटावं असं ते लग्न होतं.3 / 10मात्र लग्नानंतर काही महिन्यांनी त्यांच्यात खटके उडायला लागले. २०२० च्या लॉकडाऊनमध्ये तर त्यांचं अगदीच जमत नव्हतं. लग्नाच्या ४ वर्षांनी 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. जितकं त्यांचं लग्न तितकाच त्यांचा घटस्फोटही चर्चेत आला होता.4 / 10घटस्फोटानंतर समंथावरच अनेकांनी आरोप लावले. तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. या काळात तिला प्रचंड मानसिक तणावाला सामोरं जावं लागलं. तसंच समंथाने नागाकडून बक्कळ पोटगी घेतल्याचंही बोललं गेलं. हे सर्व ऐकल्यानंतर स्वत: नागा चैतन्यने अशा अफवांचं खंडन केलं.5 / 10आता इतक्या दिवसांनी दोघांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे समंथाचं सोशल मीडिया अकाऊंट. होय. घटस्फोटानंतर समंथाने नागा चैतन्यसोबतचे इन्स्टाग्रामवरील सर्व फोटो अर्काईव्ह केले होते. विशेषत: त्यांचे लग्नाचे फोटो. या फोटोतही तिने 'chaysam' हे कॅप्शन दिलेलं दिसत आहे. हा फोटो पुन्हा दिसतोय.6 / 10म्हणजेच त्यापैकी काही फोटो पुन्हा तिच्या अकाऊंटवर झळकलेत. यामध्ये २०१७ साली तिने नागा चैतन्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाची पोस्ट आहे. यामध्ये ती त्याला किस करत आहे. हा त्यांच्या लग्नाचा फोटो असून तो पुन्हा तिच्या अकाऊंवर आलाय. म्हणजेच तिने काही फोटो अनअर्काईव्ह केलेत. 7 / 10समंथाच्या अकाऊंटवर होणाऱ्या या हालचाली पाहता चाहत्यांना वेगळाच संशय आलाय. नागा आणि समंथाचं पुन्हा पॅचअप तर झालं नाही ना असा अंदाज चाहते लावत आहेत. 'जुनं प्रेम पुन्हा परच येतंच' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.8 / 10तर काही चाहते मात्र याचा अर्थ वेगळाच घेत आहेत. समंथा सगळं स्वीकारुन आपल्या आयुष्यात पुढे जात आहे असा अंदाज अनेकांनी लावलाय. पण हे कपल खरंच सोबत येणार असेल तर चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. 9 / 10समंथाचा नुकताच 'कुशी' सिनेमा रिलीज झाला आहे. रिलीजनंतर ती एक वर्षांच्या ब्रेकवर गेली आहे. समंथा मायोसायटिस या आजाराने त्रस्त आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. 10 / 10तर दुसरीकडे नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपालासह रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या लग्नाचीही अफवा पसरली. पण नुकतंच अभिनेत्याने या सर्व बातम्यांचं खंडन केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications