Join us

समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 2:39 PM

1 / 9
साऊथ अभिनेता नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी ४ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहे.
2 / 9
नागा चैतन्यने साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी पहिलं लग्न केलं होतं. साऊथ इंडस्ट्रीमधील ते लोकप्रिय आणि आदर्श कपल होते.
3 / 9
२०१७ साली समांथा आणि नागा चैतन्यने लग्न केलं होतं. त्याआधी काही वर्ष त्यांनी डेट केलं होतं. पण, लग्नानंतर ४ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.
4 / 9
२०२१ साली घटस्फोट घेत वेगळे होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना जबर धक्का बसला होता.
5 / 9
आदर्श कपल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या समांथा आणि नागा चैतन्यने घटस्फोट घेतल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या.
6 / 9
घटस्फोट घेण हा आयुष्यातील सगळ्यात कठीण निर्णय असल्याचं नागा चैतन्यने सांगितलं होतं. दोघांचे लाइफ गोल्स वेगळे असल्याने सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलं होतं.
7 / 9
तर नागा चैतन्यच्या कुटुंबीयांना लग्नानंतर समांथाच्या बोल्ड भूमिका पसंत नसल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचंही बोललं जात होतं.
8 / 9
नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर समांथा म्हणाली होती की 'एक महिला असणं, काम करणं, ग्लॅमरच्या दुनियेत टिकून राहणं, प्रेमात पडणं, पुन्हा त्यातून बाहेर येणं...या सगळ्यासाठी खूप हिंमत लागते. मला माझ्या प्रवासावर गर्व आहे'.
9 / 9
समांथाशी घटस्फोट घेत वेगळे झाल्यानंतर ३ वर्षांनी आता नागा चैतन्य पुन्हा लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.
टॅग्स :समांथा अक्कीनेनीसेलिब्रेटी वेडिंग