Join us

४ वर्षात नातं संपलं, गंभीर आजार झाला, पण अभिनेत्रीनं पोटगीत एक पैसाही घेतला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 18:24 IST

1 / 12
क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने घटस्फोट घेताना धनश्री वर्माला सुमारे ५ कोटी रुपये पोटगी दिली. याचीच सोशल मीडियात चर्चा आहे.
2 / 12
पण, अशातच एका अभिनेत्रीची चर्चा होतेय, जिला २०० कोटींची पोटगी तिच्या पुर्वपतीकडून देण्यात येत होती. पण, तिनं एक पैसाही घेतला नाही.
3 / 12
विशेष म्हणजे पतीपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेत्रीला गंभीर आजाराची लागण झाली होती. पण, तिनं आजारपणातही कोणाचीही मदत घेतली नाही.
4 / 12
ती अभिनेत्री आहे समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu Rejected 200 Crore Alimony).
5 / 12
समांथा ही नोव्हेंबर २०२१ मध्ये नागा चैतन्यपासून वेगळी झाली होती. दोघांनीही परस्पर संमतीनं त्यांचं चार वर्षांचं नातं संपवलं होतं.
6 / 12
साऊथ इंडस्ट्रीमधील ते लोकप्रिय आणि आदर्श कपल होते. दोघे वेगळे झाल्यानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
7 / 12
समंथा आणि नागा चैतन्य यांचे नाते संपल्यानंतर अभिनेत्रीवर करिअरसाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, २५० कोटींची पोटगी घेतली, असे अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.
8 / 12
या आरोपांवर अभिनेत्रीनं स्वतः प्रतिक्रिया दिली होती. समांथा ही अक्षय कुमारसोबत करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये आली होती. यावेळी तिला करणने त्याला विचारलं की, तिनं स्वतःबद्दल वाचलेली सर्वात वाईट गोष्ट कोणती होती? यावर अभिनेत्री म्हणाली, 'पोटगी म्हणून मी २५० कोटी रुपये घेतलेत. दररोज सकाळी मी उठते आणि आयकर अधिकाऱ्यांची वाट पाहते. आधी त्यांनी पोटगी घेतल्याची कहाणी रचली. नंतर त्यांना लक्षात आले की ती विश्वासार्ह वाटत नाहीये. मग त्यांनी सांगितले की लग्नापूर्वीचं प्री-नप साइन केलेलं आहे, त्यामुळे मी पोटगी मागू शकत नाही', असं उत्तर देत अभिनेत्रीनं २५० कोटींच्या पोटगी नाकारल्याचं स्पष्ट केलं होतं.
9 / 12
समांथाने २०१७ मध्ये नागा चैतन्यशी लग्न केले होते. नागा आणि समांथाची लव्हस्टोरी खूप चर्चेत होती
10 / 12
समंथापासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्यने गेल्या वर्षी ४ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी दुसरे लग्न केले. दोघेही २०२१ पासून एकमेकांना डेट करत होते.
11 / 12
या लग्नानंतर अभिनेत्याला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लोकांनी आरोप केला होता की, त्यांचा घटस्फोट समंथामुळे नाही तर त्याच्यामुळे झाला आहे. यासोबतच शोभिता धुलीपालावरही नेटकऱ्यांनी समांथा आणि नागा चैतन्यचा संसार मोडल्याचा आरोप केलाय.
12 / 12
नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर समांथा म्हणाली होती की 'एक महिला असणं, काम करणं, ग्लॅमरच्या दुनियेत टिकून राहणं, प्रेमात पडणं, पुन्हा त्यातून बाहेर येणं...या सगळ्यासाठी खूप हिंमत लागते. मला माझ्या प्रवासावर गर्व आहे'.
टॅग्स :समांथा अक्कीनेनीघटस्फोटलग्न