Join us  

शोबिताने शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला केलं ट्रोल, म्हणाले- "समांथा हिरा आहे आणि ही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 11:59 AM

1 / 7
नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी गुरूवारी(८ ऑगस्ट) साखरपुडा करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
2 / 7
नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनी साखरपुड्यासाठी पारंपरिक साज केला होता.
3 / 7
शोभिताने नुकतेच साखरपुड्यातील काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. पण. हे फोटो पाहून समांथाच्या चाहत्यांनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.
4 / 7
नागा चैतन्य आणि शोभिताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर अनेकांनी नागा चैतन्याला ट्रोल केलं आहे.
5 / 7
'सोन्याच्या शोधात त्याने हिरा गमावला', 'समांथा हिरा होती', 'तू हिरा गमावला आहेस', 'समांथा तुमच्या दोघांपेक्षा खूप यशस्वी आहे', अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
6 / 7
नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर काहीच वर्षांत २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
7 / 7
समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत होता. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
टॅग्स :Tollywoodसमांथा अक्कीनेनीसेलिब्रिटी