Join us  

एक रील व्हायरल झालं अन् थेट प्रभाससोबत सिनेमात झळकण्याची संधी! कोण आहे ही सोशल मीडिया स्टार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 5:05 PM

1 / 7
सध्या सोशल मीडिया स्टारला सिनेमात काम करण्याची मोठी संधी मिळतेय. अशीच एक सुवर्णसंधी मिळाली सोशल मीडिया स्टार असलेल्या इमानवीला.
2 / 7
इमानवीचे इन्स्टाग्रामवर ९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. इमानवीला हैद्राबादमध्ये फौजी सिनेमाच्या मुहुर्त शॉटला बघायला मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
3 / 7
इमानवी इस्माईल ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आता प्रभाससोबत फौजी सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे. सोशल मीडियामुळे इमानवीला ही मोठी संधी मिळाली
4 / 7
इमानवी ही सुप्रसिद्ध नृत्यांगना असून तिच्या डान्स रील्सला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळाली. याशिवाय तिच्या रील्सला सुद्धा मीलियनच्या घरात व्ह्यूज असतात
5 / 7
फौजी मध्ये इमानवी प्रभाससोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. इमानवीने सिनेमाच्या मुहुर्त पूजेला प्रभास आणि सिनेमाच्या इतर टीमसोबत फोटोशूट केलं
6 / 7
फौजी सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा दिसणार असून इमानवी आणि प्रभासची नवी जोडी प्रेक्षकांना कशी पसंत पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे
7 / 7
सातत्याने रील करत राहिल्याने एखाद्याचं नशीब कसं चमकू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इमानवी. इमानवी सिनेमात बघायला तिचे फॉलोवर्स उत्सुक असतील यात शंका नाही
टॅग्स :प्रभाससोशल मीडिया