Join us

Photos: मुंबईत ७० कोटींचा आलिशान फ्लॅट, साऊथ अभिनेत्रीची नवऱ्यापेक्षाही जास्त नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:19 PM

1 / 9
सध्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलिवूडमध्येही आपला डंका गाजवत आहेत. उत्तम हिंदी बोलून त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत.
2 / 9
अशीच एक साऊथ अभिनेत्री जिचा नवरा सुपरस्टार आहे. पण तिची नेटवर्थ नवऱ्यापेक्षाही जास्त आहे. कोण आहे ती?
3 / 9
ही अभिनेत्री आहे ज्योतिका (Jyotika). उद्या १८ ऑक्टोबर रोजी ज्योतिका वाढदिवस साजरा करत आहे. ज्योतिका ही साऊथमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तसंच तिचा नवरा सूर्या हा साऊथ सुपरस्टार आहे.
4 / 9
नुकतंच ज्योतिका 'शैतान' या अजय देवगणच्या हिंदी सिनेमात दिसली. ज्योतिका अनेकदा कामानिमित्त मुंबईत असते. तिच्या नावावर मुंबईत आलिशान फ्लॅटही आहे.
5 / 9
ज्योतिका आणि सूर्या ची नेटवर्थ ५३७ कोटी रुपये आहे. मुंबईत त्यांचा ७० कोटींचा फ्लॅट आहे. सध्ये ते मुंबईतच राहत आहेत अशी चर्चा आहे. त्यांची मुलं मुंबईतच शिक्षण घेत आहेत.
6 / 9
ज्योतिकाच्या एकटीच्या नेटवर्थबद्दल सांगायचं तर तिच्याकडे तब्बल ३३१ कोटी संपत्तीची मालकीण आहे. नवऱ्याहून जास्त तिची संपत्ती आहे. सूर्याकडे २०६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याने नुकतंच 'कंगुआ' सिनेमासाठी ३० कोटी मानधन घेतलं होतं.
7 / 9
ज्योतिकाने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना लग्न केलं होतं. लग्नानंतर ती ७ वर्ष इंडस्ट्रीमधून गायब होती. २०१५ मध्ये तिने 36 Vayadhinile मधून कमबॅक केलं. एका सिनेमासाठी ती सुमारे ५ कोटी घेते.
8 / 9
सूर्या आणि ज्योतिकाची प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन कंपनी आहे. मुलं दिव्या आणि देव यांच्या नावावरुन त्यांनी कंपनीचं नाव '2D' असं ठेवलं.
9 / 9
त्यांच्या कार कलेक्शनमध्ये BMW, ऑडी, मर्सिडीज, आणि जॅग्वार या कार आहेत. प्रत्येक कार कोटींच्या घरात आहे.
टॅग्स :Tollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी