Join us  

५० सेकंदांची फी ५ कोटी, खासगी जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:39 PM

1 / 12
ही अभिनेत्री साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केलं आहे आणि ती खूप आलिशान जीवन जगते. अभिनेत्रीची संपत्तीची माहिती मिळताच हैराण व्हाल.
2 / 12
अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये फक्त एकच ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. तरीही, ५० सेकंदाच्या परफॉर्मन्ससाठी ५ कोटी रुपये फी घेते. ही अभिनेत्री कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिने प्रभास, शाहरुख खानसह अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.
3 / 12
ही अभिनेत्री म्हणजे साऊथची सुपरस्टार 'नयनतारा' आहे. नयनताराने साऊथमध्ये अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत आणि तिने शाहरुख खानसोबतच्या ब्लॉकबस्टर 'जवान'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
4 / 12
नयनताराने तमिळ चित्रपटसृष्टीत जास्त काम केलं आहे. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत तिने ७५ हून अधिक चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले.
5 / 12
आज नयनताराचा समावेश देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत झाला आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मल्याळम चित्रपट मनासिनक्करे या चित्रपटातून केली होती.
6 / 12
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. यानंतर, अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि अय्या, चंद्रमुखी, गजनी आणि बरेच काही हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट केले.
7 / 12
नयनताराचा 'बिल्ला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटानंतर ती स्टार बनली. २०१० मध्ये, तिने बॉक्स ऑफिसवर पाच हिट चित्रपट दिलं. यासोबतच तिला लेडी सुपरस्टारचा टॅगही मिळाला.
8 / 12
अभिनेत्रीने २०२३ मध्ये शाहरुख खानसोबत 'जवान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ६४०.२५ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं. या चित्रपटाने जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
9 / 12
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराने टाटा स्कायसाठी ५० सेकंदांची जाहिरात करण्यासाठी ५ कोटी रुपये इतकी मोठी फी वसूल केली आहे. ही जाहिरात तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह ४ भाषांमध्ये २ दिवसांत शूट करण्यात आली.
10 / 12
नयनतारा अतिशय आलिशान जीवन जगते. ती एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेते. नयनताराची एकूण संपत्ती २०० कोटी रुपये आहे.
11 / 12
अभिनेत्रीकडे ५० कोटी रुपयांचं खासगी जेट असल्याचंही सांगण्यात येत आहे. नयनताराचा विवाह विघ्नेश सिवनशी झाला आहे. या दोघांना दोन गोड मुलं आहेत.
12 / 12
टॅग्स :नयनताराबॉलिवूड