३ वेळा मोडलं लग्न, आता चौथ्यांदा ही अभिनेत्री थाटणार संसार?, समोर आलं सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 12:57 PM1 / 11प्रसिद्ध तमीळ अभिनेत्री वनिता विजयकुमार मागील काही दिवसांपासून तिच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.2 / 11खरेतर अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी गुडघ्यावर बसून कोरिओग्राफर रॉबर्टला प्रपोझ करतानाचा फोटो शेअर केला होता आणि लग्नाची घोषणा केली होती.3 / 11अभिनेत्रीने तिच्या लग्नाची जाहीर केली होती. तिने पोस्टमध्ये सांगितले होते की, तिचे लग्न ५ ऑक्टोबरला आहे. 4 / 11वनिता विजयकुमार लग्नाबद्दल सांगितल्यानंतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तर काहींनी तिला चौथ्या लग्नावरून ट्रोल केले होते.5 / 11मात्र आता नवीन माहितीनुसार वनिता आणि रॉबर्ट लग्न करत नाहीत. अभिनेत्रीने रॉबर्टसोबतच्या लग्नाच्या प्रपोझलचा जो फोटो शेअर केला होता, तो तिच्या आगामी प्रोजेक्टचा प्रोमो होता.6 / 11फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, वनिता आणि रॉबर्टने त्यांचा प्रोजेक्ट अशारितीन प्रमोट केला होता, जे पाहून त्यांनी लग्नाची घोषणा केल्याचे वाटत होते.7 / 11आता त्या दोघांनी जाहीर केले की, ते दोघे मिसेस अँड मिस्टरमध्ये झळकणार आहेत आणि हा फोटो या चित्रपटाच्या शूटिंगचा होता.8 / 11अभिनेत्रीला तिच्या नव्या चित्रपटासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की, त्यांना आधीपासूनच माहित होते.9 / 11वनिता विजयकुमार तमीळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २००० साली अभिनेता आकाशसोबत लग्न केले होते. या लग्नापासून तिला दोन मुले आहेत. मात्र २००५ साली दोघांचं घटस्फोट झाला.10 / 11पहिले लग्न तुटल्यानंतर वनिताने बिझनेसमन जय राजनसोबत २००७ साली दुसरे लग्न केले होते. या लग्नापासून तिला एक मुलगी आहे. मात्र २०१२ साली ते दोघे वेगळे झाले होते.11 / 11यानंतर २०२०मध्ये अभिनेत्रीने तिसरे लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच हे लग्नही मोडले. आणखी वाचा Subscribe to Notifications