Starkids Love Life: खुल्लमखुल्ला प्रेम करण्यात पटाईत आहे हे स्टारकीड्स, या अभिनेत्याची लेक अव्वलस्थानी By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 5:30 PM1 / 6कलाकारांची आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रेमप्रकरणं हा बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान, आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक स्टारकिड्सही खुल्लम खुल्ला प्रेम करत असतात. अशाच काही स्टारकीड्सच्या लव्हलाईफविषयी.2 / 6सुपरस्टार आमिर खान याची लेक आइरा खान हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याला डेट करते. आइरा आपली लव्ह लाईफ सोशल मीडियावर बिनधास्तपणे शेअर करत असते. तसेच तिच्या पालकांनाही तिच्या नात्याबाबत माहिती आहे. 3 / 6आलिया कश्यप ही तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरे याच्यासोबत नात्यामध्ये आहे. आलिला कश्यप ही बॉयफ्रेंडसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 4 / 6जॅकी श्रॉफची कन्या कृष्णा श्रॉफ बऱ्याच काळापासून अॅबन हायम्सला डेट करत होती. दोघेही सोशल मीडियावर खूप इंटिमेंट फोटो शेअर करायचे आता दोघेही वेगळे झाले आहेत. मात्र तोपर्यंत तिने आपली लव्ह लाईफ मीडियापासून लपवून ठेवली नव्हती. 5 / 6सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसुद्धा रिलेशनमध्ये आहे. तो गर्लफ्रेंड अनाया श्रॉफ हिला डेट करतो. हे स्टार कपल आपली लव्ह लाईफ फॅन्सपासून लपवून ठेवत नाही. दोघेही एकमेकांसोबत दिसतात. तसेच सोबतच सुट्ट्या एन्जॉय करतात. 6 / 6बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर हा त्याच्या अभिनयापेक्षा मलायका अरोडासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असतो. दोघेही आपल्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच ते आपलं नातं खुलेपणाने जगासमोर आणत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications