गे असल्याचं सांगत बायकोने दिला घटस्फोट, जॅकी श्रॉफच्या पत्नीला डेट करत असल्याची पसरवली अफवा, कोण आहे हा अभिनेता? By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 4:23 PM1 / 9असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे काही सिनेमे करून नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेले. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता साहिल खान. 2 / 9स्टाइल सिनेमातून प्रसिद्धीझोतात आल्यानंतर साहिल खान अनेक सिनेमांमध्ये दिसला. पण, स्टाइल नंतर मात्र त्याची जादू फिकी पडली. 3 / 9साहिलने एक्सक्यूज मी, ये है जिंदगी, डबल क्लास, अलादिन अशा सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण, बॉलिवूडमधील करिअरपेक्षा पर्सनल आयुष्यामुळेच तो जास्त चर्चेत होता. 4 / 9महादेव बेटिंग अॅप प्रकरणात साहिलचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटकही केली होती. 5 / 9साहिलने अभिनेत्री नेगर खान हिच्याशी विवाह केला होता. मात्र अवघ्या काही वर्षांतच त्यांचा संसार मोडला. 6 / 9साहिल गे असल्याचं सांगत अभिनेत्रीने त्याला घटस्फोट दिला होता. पण, साहिलने मात्र हे सत्य नसल्याचं सांगितलं होतं. 7 / 9जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा यांच्याबरोबर साहिल बिजनेसमध्ये उतरला होता. तेव्हा त्या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 8 / 9पण, हे खोटं असून साहिलनेच या अफवा पसरवल्याचं आयेशा श्रॉफ यांनी म्हटलं होतं. त्यांनी मानहानी आणि बिजनेसमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करत साहिलविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. 9 / 9सध्या साहिल सिनेसृष्टीपासून दूर असून त्याची स्वत:ची जीम आहे. यातून तो बरेच पैसे कमावतो. त्याचं युट्यूब चॅनेल देखील आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications