Join us

Suhana Khan to Sara Tendulkar Fitness of Celebrity Kids: सुहाना खान ते सारा तेंडुलकर... सेलिब्रिटींची मुलं स्वत:ला कसं ठेवतात Fit & Fine? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 2:06 PM

1 / 9
सेलिब्रिटी किड्सवर चाहत्यांचं खूप लक्ष असतात. युवा तरूण-तरूणी त्यांच्या फिटनेसचे चाहते असतात. त्यामुळे सेलिब्रिटींची मुलेही फिट राहण्यासाठी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत असतात.
2 / 9
स्टार किड्स आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी केवळ आहाराकडेच लक्ष देत नाहीत तर जिममध्ये तासनतास वर्कआउट आणि योगा देखील करतात.
3 / 9
काही सेलिब्रिटींची मुलं चित्रपटांत काम करून प्रसिद्धी मिळवतात, तर काही विविध कारणांमुळे प्रसिद्धीझोतात येत असतात.
4 / 9
त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना ही मुलं नेहमीच फिट आणि नीटनेटकी दिसतात. जाणून घेऊया त्यापैकी काही स्टार किड्सचा फिटनेस फंडा
5 / 9
सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) - सारा ही महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी आहे. तिचे खूप चाहतावर्ग आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये व्यायाम करणं कधीही चुकवत नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी ती जिममध्ये धावणं आणि योगासनं करणं यावर भर देते. तसेच, हेल्दी डाएटही घेते.
6 / 9
सुहाना खान (Suhana Khan) - बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची मुलगी सुहाना ही फिटनेस फ्रीक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये वर्कआऊट करते. सुहानाला जिममध्ये Pilates Exercise म्हणजेच कमी कष्टदायी पण अधिक परिणामकारक व्यायाम करायला जास्त आवडत. हा व्यायाम Pilates calisthenics व्यायामाने प्रेरित असून त्यात ५०० व्यायाम प्रकार आहेत. या व्यायामामुळे स्नायू अधिक लवचिक आणि मजबूत होतात.
7 / 9
सारा अली खान (Sara Ali Khan) - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची लेक सारा हिने तिचं वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. चित्रपटांमध्ये येण्याआधी तिचं वजन खूप जास्त होतं. पण शरीर तंदुरुस्त आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तिने योगासने आणि कार्डिओ व्यायाम यावर भर दिला. आजही ती निरोगी राहण्यासाठी व वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे सर्व व्यायाम करते.
8 / 9
अनन्या पांडे (Ananya Pandey) - विनोदी भूमिका करणारा अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे ही देखील फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. सकाळच्या इतर सर्व कामांसह व्यायामासाठी ती वेळ राखून ठेवते. तिच्या दिवसाची सुरूवात योगासनांनी होते. तसंच ती जिममध्येची वर्कआऊट करण्याकडे विशेष लक्ष पुरवते. वर्कआऊट झाल्यानंतरच ती दिवसभरातील इतर नियोजित कामांना सुरूवात करते.
9 / 9
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) - प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर ही देखील फिटनेसकडे खूप लक्ष देते. तंदुरुस्त राहण्यासाठी ती नियमितपणे जिममध्ये व्यायाम करते. फिट राहण्यासाठी जिम व्यतिरिक्त ती स्विमिंग आणि जॉगिंगही करते. जान्हवीचा योगा करण्यावर भर असल्याने ती इतरांनाही योगासने करण्याचा सल्ला देते.
टॅग्स :सारा तेंडुलकरसुहाना खानजान्हवी कपूरसारा अली खानअनन्या पांडे