Join us

आमिर खानसोबत करिअरची सुरुवात, बँकेचा कर्ज देण्यास नकार; आता आहे कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 2:13 PM

1 / 10
सुमोना चक्रवर्तीने पहिल्यांदा वयाच्या ११ व्या वर्षी कॅमेऱ्यासमोर अभिनय केला. सुमोना आमिर खानच्या 'मन' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर पुढील काही वर्षांत तिने कसम से, जासूस गुडिया, कस्तुरी, नीर भरे तेरे नैना देवी आणि सपना से भरे नैना असे अनेक टीव्ही शो केले.
2 / 10
२०११ मध्ये सुमोना एकता कपूरच्या लोकप्रिय शो 'बडे अच्छे लगते हैं' मध्ये दिसली होती. सुमोनाने नताशा अमरनाथ कपूरची भूमिका साकारली आणि हा शो सुमोनासाठी लकी चार्म ठरला.
3 / 10
साक्षी तन्वर आणि राम कपूरचा शो तीन वर्षे चालला आणि या शोनेमुळे तिला काही संधी मिळाल्या. 'बडे अच्छे लगते हैं' सोबतच सुमोनाने 'कहानी कॉमेडी सर्कस की विथ कपिल शर्मा'मध्येही भाग घेतला होता.
4 / 10
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा' आणि 'द कपिल शर्मा शो' मधून तिला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सुमोनाने खुलासा केला की, तिची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःचं घर खरेदी करणे.
5 / 10
तिने त्यावेळची आठवण सांगितली. तिला बँकेकडून होम लोन मिळत नव्हतं. 'मला अजूनही आठवतंय की, माझा पगार फिक्स नसल्याने बँका मला कर्ज देण्यास कचरत होत्या.'
6 / 10
सध्या सुमोना ही रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 14' च्या शूटिंगसाठी रोमानियामध्ये आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा श्रॉफ, अभिषेक कुमार, शालीन भनोत, आसिम रियाज, करण वीर मेहरा, शिल्पा शिंदे यांना पराभूत करून सुमोना सर्वात भारी स्पर्धक ठरत आहे.
7 / 10
सुमोनाची एकूण संपत्ती सुमारे ९१ कोटी रुपये आहे. 'द कपिल शर्मा शो'मधून सुमोना चक्रवर्तीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शोमध्ये तिने कपिलची पत्नी बिंदूची व्यक्तिरेखी साकारून अनेकांची मने जिंकली.
8 / 10
'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरी आणि बिंदूच्या भूमिकेत या अभिनेत्रीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.
9 / 10
कॉमेडी शोच्या प्रत्येक सीझनचा भाग असलेली सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
10 / 10
टॅग्स :सुमोना चक्रवर्ती