लेकीच्या लग्नात अण्णा सुनील शेट्टी भावूक, शेअर केले खास फोटो, अथिया राहुलच्या लग्नाचे Unseen Photos By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 11:08 AM1 / 9अण्णा सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी नुकतीच लग्नबंधनात अडकली. भारतीय क्रिकेटपटू के एल राहुल सोबत दिड वर्ष डेट केल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.2 / 9या न्युली वेड कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवविवाहित वधू अथिया गुलाबी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल १० हजार तास लागल्याची माहिती आहे.3 / 9लेकीचं लग्न म्हणलं की बापासाठी तो सर्वात मोठा भावूक क्षण असतो. सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टी दोघेही भावूक झाल्याचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.4 / 9नवजोडप्यावर फुलांचा वर्षाव करतानाचाही फोटो सुनील शेट्टीने शेअर केला आहे. यामध्ये अथिया आणि राहुल यांनी हात जोडले आहेत आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत आहेत. तर दोघांचेही आईवडील त्यांच्यावर कौतुकाने फुलांचा वर्षाव करत आहेत.5 / 9बहिणीच्या लग्नात तिचा भाऊ दाखवत नसला तरी तोही भालूक होतोच. अथियाचा भाऊ अहान शेट्टीनेही लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या लाडक्या बहिणीला तो मंडपात घेऊन येतानाचा तो खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.6 / 9तसेच एका फोटोत अहान दोघांकडेही कौतुकाने पाहत आहे. त्याच्या हातात पुजेचे ताट आहे. तो अथिया च्या पायाशी बसला आहे. माझे तुम्हा दोघांवरही खूप प्रेम आहे. तुमचे जीवन आनंदी राहो असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे. 7 / 9अथिया आणि राहुलचा हा शाहीविवाहसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. बॉलिवुड आणि क्रिकेटमधील काही दिग्गजांनी या लग्नसोहळ्यात उपस्थिती दर्शवत नवजोडप्याला आशिर्वाद दिले. 8 / 9ज्या घराने आपल्याला खूप आनंद आणि चांगले क्षण दिले त्याच घरात आपण विवाहबद्ध झाल्याचा मला आनंद आहे असे कॅप्शन अथियाने लिहिले आहे.9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications