PHOTOS : लेकाची नाही, अण्णाच्या होणाऱ्या सूनेची चर्चा! अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 15:25 IST
1 / 10बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. पण तूर्तास तरी अण्णाच्या लेकाची कमी अन् अण्णाच्या होणाऱ्या सूनबाईचीच चर्चा जोरात आहे.2 / 10होय, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सध्या तानिया श्रॉफला डेट करतोय. आज तानियाचा वाढदिवस, अशात अहानने तानियाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.3 / 10तानिया व अहान शाळेच्या दिवसांपासूनचे मित्र आहेत. आता हे नातं मैत्रीच्या पलीकडे गेले आहे.4 / 10आहानने एका पोस्टमध्ये आय लव्ह यू म्हणत जाहीरपणे तानियावरच्या प्रेमाची कबुली दिली होती. 5 / 10अहान व तानिया अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेट, व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात.6 / 10अहानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तानियासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो पाहायला मिळतात.7 / 10अहानची कथित गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफ ही बिझनेसमॅन जयदेव श्रॉफ यांची मुलगी आहे.8 / 10 तानियाने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अर्थात तिचे बालपण मात्र मुंबईत गेले़. 9 / 10 तानिया लंडन स्कूल ऑफ फॅशनमधून फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करतेय. तानिया केवळ ७ वर्षांची असताना तिचे आई-वडिल जयदेव आणि रोमिला एकमेकांपासून विभक्त झालेत. 10 / 10अहान लवकरच साजीद नाडियाडवालाच्या ‘तडप’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तारिया सुतारिया मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.