PHOTOS: बॉलिवूडची लेडी अंबानी आहे सुनील शेट्टीची पत्नी; एकटी सांभाळते कोट्यवधींचा बिझनेस By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 7:00 AM1 / 9बॉलिवूड कलाकार कायमच त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइमुळेही चर्चेत येत असतात. यात खासकरुन त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि संपत्तीची चर्चा होते. सध्या अशीच चर्चा अभिनेता सुनील शेट्टीच्या पत्नीची होत आहे. (Photo Instagram) 2 / 9 आपल्या अभिनयामुळे सुनील शेट्टीने गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र, आता त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. अभिनेेता असण्यासोबतच सुनील शेट्टी एक यशस्वी उद्योजकही आहे. त्यामुळे तो पैशासांठी सिनेमांंवर अजिबात अवलंबून नाही. (Photo Instagram) 3 / 9सुनील शेट्टी पेक्षा त्याची बायको जास्त श्रींमत आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून तिला दूरच राहणे आवडते. त्याची पत्नी त्याला प्रत्येक टप्प्यावर साथ देत आहे म्हणूनच बॉलिवूडमधील एक पावर कपल म्हणून या दोघांना ओळखलं जातं. (Photo Instagram) 4 / 9सुनील शेट्टीच्या पत्नीचं नाव ‘मान शेट्टी’ आहे मानला बॉलिवूडमधील लेडी अंबानी म्हटलं जातं.(Photo Instagram) 5 / 9माना ही एक बिझनेस वूमन आहे. समाजसेविकाही म्हणून देखील तिची ओळख आहे. (Photo Instagram) 6 / 9माना एक बिझनेस वूमन असून तिने कलाविश्वात तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे घर आणि व्यवसाय या दोघांचा ती बरोबर समतोल राखते. (Photo Instagram) 7 / 9माना आणि सुनील शेट्टी यांनी मिळून S2 हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी मुंबईत २१ लक्झरी विला उभारले आहेत.(Photo Instagram) 8 / 9मानाचं एक लाइफस्टाइल स्टोरदेखील आहे. यात डेकोरेशनपासून ते दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही लक्झरी वस्तूही सहज उपलब्ध होतात.(Photo Instagram) 9 / 9माना 'सेव द चिल्ड्रन इंडिया' ही एनजीओदेखील चालवते. तसंच सुनील शेट्टीचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. त्यामुळे ही नवरा-बायकोची जोडी वर्षाला कोटयवधींची कमाई करतात. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications