Join us

Gadar 2 :सनी देओलच्या पत्नीला कधी पाहिलंत?, लाईमलाईटपासून दूर राहणारी पूजा दिसते खूपच सुंदर, जगतेय 'असं' आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:13 AM

1 / 9
Sunny Deol: बॉलिवूडचा दमदार अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सनी देओल सध्या त्याच्या 'गदर 2'मुळे खूप चर्चेत आहे. त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील खूप चर्चेत असतो. (Photo Instagram)
2 / 9
बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सनी देओल धर्मेन्द्र यांचा मुलगा आहे, हे आपण सगळेच जाणतो. पण सनी देओलची पत्नीबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. (Photo Instagram)
3 / 9
सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण पत्नी पूजा देओल हिचा फोटो मात्र चुकूनही त्याच्या सोशल अकाऊंटवर दिसत नाही. (Photo Instagram)
4 / 9
सनी देओलची पत्नी आणि धर्मेन्द्र यांची मोठी सून पूजा देओल मीडियापासून दूर राहते. सौंदर्याच्या बाबतीत पूजा देओल बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. (Photo Instagram)
5 / 9
सनी व पूजा यांना करण व राजवीर अशी दोन मुले आहेत. करणने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. (Photo Instagram)
6 / 9
सनी देओलची पत्नी पूजा देओल चित्रपट जगतापासून दूर आहे आणि तिने लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे आणि तिथेच वाढली आहे. इतकंच नाही तर ती तिच्या घराची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडते. (Photo Instagram)
7 / 9
पूजा देओल आणि सनी देओलचं लग्न हे अरेंज्ड मॅरेज होते बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच सनीने पूजासोबत लग्न केले होते. हे साल होते १९८४. पण सनी आणि पूजा यांचे लग्न अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवण्यात आले होते.(Photo Instagram)
8 / 9
पुढे सनीच्या लग्नाचे फोटो युकेच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेत आणि या लग्नाबद्दल जगाला कळले. अर्थात यानंतरही आजपर्यंत कधीच सनी व पूजा यांना पब्लिकली एकत्र पाहिले गेले नाही. (Photo Instagram)
9 / 9
पूजा देओल लग्नानंतरही लंडनमध्ये राहायची आणि सनी देओल इथे भारतातच राहायचा. जेव्हाही अभिनेताला वेळ मिळतो तेव्हा तो चित्रपटांमधून ब्रेक घेऊन पत्नीला भेटण्यासाठी लंडनला जात असे. दोघांच्या लग्नाला जवळपास ३५ वर्षे झाली आहेत. (Photo Instagram)
टॅग्स :सनी देओलधमेंद्र