suryavansham heera thakur gauri aka rachana banerjee 2 marriages broken living life with one kid
'सूर्यवंशम'मधील हीरा ठाकूरची गौरी सध्या कुठेय? दोन लग्न मोडली, आता मुलासोबत जगतेय असं आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 5:37 PM1 / 9१९९९ साली आलेला सूर्यवंशम आजही तितकाच लोकप्रिय बॉलिवूड सिनेमा आहे. या सिनेमातील हीरा ठाकूरची सक्सेस स्टोरी चाहत्यांना भावली होती. 2 / 9या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री सौंदर्या राधाच्या भूमिकेत होती. याच सिनेमात रचना बॅनर्जी यांनी गौरीची भूमिका साकारली होती. 3 / 9सूर्यवंशममध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रोमँटिक गाणंही केलं होतं. 4 / 9रचना यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तमिळ, तेलुगु, बंगाली, कन्नड भाषिक सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत. 5 / 9पण, त्यांना म्हणावी तितकी लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अभिनयाला रामराम केला. 6 / 9पण, आता त्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत. रचना एक बिजनेस वुमन असून त्यांचा स्वत:चा कॉस्मेटिक ब्रँड आहे. 7 / 9रचना यांना वैवाहिक आयुष्यातही सुख मिळालं नाही. त्यांनी सिद्धांत मोहापात्राशी लग्न केलं होतं. मात्र २००४ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. 8 / 9त्यानंतर २००७ साली प्रबल बसू यांच्याबरोबर त्यांनी दुसरा संसार थाटला. मात्र त्यांचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे.9 / 9रचना बॅनर्जी या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 873K फॉलोवर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications