मैं परेशान परेशां...परेशान, परेशान...! बोरिंग लव्ह लाईफमुळे त्रासली संजना सांघी By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 2:19 PM1 / 10सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’मधून डेब्यू करणारी अभिनेत्री संजना सांघी सध्या जरा कन्फ्युज आहे. कारण काय तर लव्ह लाईफ.2 / 10होय, अद्याप आयुष्यात कुणीही नाही. म्हणजे, संजना सिंगल आहे आणि याचे दु:ख तिला आहे.3 / 10अलीकडे एका मुलाखतीत संजना लव्ह लाईफवर बोलली. मी अद्याप सिंगल आहे. आयुष्यात कुणीतरी हवंय. पण अद्याप आयुष्यात कुणीही नाही आणि हे खूप वाईट आहे, असे संजना म्हणाली.4 / 10मला रिलेशनशिपमध्ये पडायचे नाही, असे अजिबात नाही. मलाही प्रेम हवंय, जोडीदार हवा आहे आणि त्यासाठी मी ओपन आहे, पण काळासोबत ‘टाईप’ बदलतोय, असे ती म्हणाली.5 / 10आता हा ‘टाईप’ बदलणे म्हणजे काय तर संजनाच्या बॉयफ्रेन्डबद्दलच्या अपेक्षा काळासोबत बदलत आहेत.6 / 10ती सांगते, शाळेत असताना मला फुटबॉल प्लेअर आवडत. कॉलेजमध्ये असताना मला बोरिंग टाईपचे अभ्यासू मुलं आवडू लागलीत. पण आता मला कशी मुलं आवडतात, याचा मी विचार करतेय.7 / 10एकंदर काय तर कसा मुलगा हवा, हेच संजनाच्या कनफ्युजनचे कारण आहे.8 / 10संजना लवकरच आदित्य राय कपूरसोबत ‘ओम- द बॅटल विदइन’ या सिनेमात दिसणार आहे. कोरोना महामारीमुळे सध्या या सिनेमाचे शूटींग रखडले आहे.9 / 10‘रॉकस्टार’ या चित्रपटात संजनाने नरगिसच्या बहिणीची भूमिका साकारली होती. संजना यात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.10 / 10त्याआधी अनेक जाहिरातींमध्ये संजना झळकली होती. ‘दिल बेचारा’ हा लीड हिरोईन म्हणून तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications