वाचा कोण आहे सुशांतची बहीण प्रियांका? रियाने तिच्यावर लावला होता शारीरिक अत्याचाराचा आरोप! By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 4:27 PM1 / 9सुशांत सिंह राजपूत केसप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे आणि दावे केले आहेत. ज्यांची सतत चर्चा होत आहे. रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलसोबत बोलाना खुलासा केला होता की, सुशांत सिंह राजपूतची मोठी बहीण प्रियंका सिंहने तिचं शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. हा गंभीर आरोप लावण्यात आलेली प्रियंका सिंह कोण आहे, ती काय करते हे तुम्हाला सांगणार आहोत.2 / 9प्रियंका सिंह हे व्यवसायाने वकील आहे. ती तिचा पती सिद्धार्थ तंवरसोबत राहते. सिद्धार्थही व्यवसायाने वकील आहे. ते दिल्लीच्या हाय कोर्टात २००७ पासून वकिली करत आहेत. प्रियांका आणि सिद्धार्थ यांचं दिल्लीतील नरायणामध्ये ऑफिस आहे. प्रियांका सिंह या सुद्धा छोट्या बहिणींप्रमाणे सोशल मीडियावर आहेत. पण ती जास्त सक्रिय नाही.3 / 9प्रियांका सिंहच्या ट्विटर अकाऊंटबाबत सांगायचं तर त्यांनी १९ ऑगस्टला शेवटचं ट्विट केलं होतं. १९ ऑगस्टच्या ट्विटमध्ये त्यांनी भाऊ सुशांतसोबतचा एका फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करून ही केस सीबीआयकडे गेल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता.4 / 9त्यासोबतच प्रियांका सिंह यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये स्वत:ला निसर्गवादी, स्टारगेजर, म्युझिक लवर, खेळप्रेमी, कलाकार, मानवतावादी आणि व्यवसायाने वकील सांगितलं आहे. 5 / 9रिया मुलाखतीत प्रियांकावर आरोप करत म्हटले होते क, 'एका पार्टीमध्ये मी, सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या बहिणीसहीत त्याच्या परिवारातील इतर लोक होते. प्रियांकाने नशेत माझं उत्पीडन करण्याचा प्रयत्न केला होता. नको त्या ठिकाणी तिने स्पर्श केला होता'.6 / 9रिया पुढे म्हणाली होती की, 'एप्रिल २०१९ च्या जवळपासची गोष्ट आहे. एका रात्री मी आणि प्रियांका एका पार्टीला गेलो होतो. तिथे प्रियांकाने भरपूर दारू प्यायली होती. ज्यामुळे ती पार्टीत पुरूषांसह महिलांसोबतच विचित्र वागू लागली होती. 7 / 9तिथून परतल्यानंतर मी सुशांतच्या रूममध्य झोपले होते. जेव्हा अचानक माझा डोळा उघडला तेव्हा बाजूला प्रियांका झोपलेली दिसली. ती मला जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती'.8 / 9रिया म्हणाली की, 'तो सगळा प्रकार पाहून मी फार हैराण झाले आणि मी प्रियांकाला लगेच रूममधून जाण्यास सांगितले. नंतर मी स्वत:च रूममधून गेले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मी सुशांत सिंह राजपूतला काही सांगितलं नव्हतं. 9 / 9कारण मी तेथून अर्ध्या रात्रीच चेन्नईसाठी निघाले होते. चेन्नईमध्ये माझ्या एका सिनेमाचा मुहूर्त होता. ही बाब मी सुशांतचा चॅटवर सांगितली. नंतर प्रियांका आणि सुशांतमध्ये त्या दिवशी भांडण झालं होतं'. आणखी वाचा Subscribe to Notifications