Join us

In Pics: सुशांत नाही एकटा, हे आहेत 10 स्टार्स ज्यांचे सिनेमे त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 1:32 PM

1 / 11
सुशांत सिंग राजपूत - सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. आज सुशांत आपल्यात नाही. पण त्याच्या अनेक आठवणी आपल्यासोबत आहेत. ‘दिल बेचारा’ हा त्याचा अखेरचा सिनेमा लवकरच रिलीज होतोय.
2 / 11
ऋषी कपूर - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेत ऋषी कपूर यांचे गेल्या 30 एप्रिलला निधन झाले. ते कॅन्सरने ग्रस्त होते. आजारपणातून बरे झाल्यानंतर त्यांनी ‘शर्माजी नमकीन’ हा सिनेमा साईन केला होता. हा त्यांचा अखेरचा सिनेमा.या सिनेमाचे काही शूटींगही पूर्ण केले होते. अद्याप चित्रपटाचे काही शूटींग बाकी आहे. हे शूटींग पूर्ण करून हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.
3 / 11
श्रीदेवी - 24 फेबु्रवारी 2018 रोजी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. ‘हिरो’ हा तिचा अखेरचा सिनेमा म्हणता येईल. शाहरूख खानच्या या सिनेमात श्रीदेवी कॅमिओ रोलमध्ये होती.
4 / 11
दिव्या भारती - वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्या भारतीने अचानक जगातून एक्झिट घेतली. तिच्या मृत्यूपश्चात तिचे तीन सिनेमे रिलीज झाले होते. यात एक ‘थोली मुध्दू’ हा तेलगू सिनेमा होता. तर रंग आणि शतरंज हे दोन हिंदी सिनेमे होतेय. शतरंज हा दिव्याचा अखेरचा सिनेमा ठरला. तिच्या मृत्यूनंतर 8 महिन्यांनी हा सिनेमा रिलीज झाला होता. शूटींग तर दिव्याने पूर्ण केले होते. पण आवाजासाठी डबिंग आर्टिस्टचा वापर करावा लागला होता.
5 / 11
फारूख शेख - अभिनेते फारूख शेख यांनी 2014 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे यंगिस्तान व चिल्ड्रेन आॅफ वॉर हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. वाइड रिलीजमुळे यंगिस्तान हा फारूख यांचा शेवटचा सिनेमा मानला जातो.
6 / 11
स्मिता पाटील - मुलाच्या जन्मानंतर पंधरा दिवसांनी स्मिता पाटीलने जगाचा निरोप घेतला होता. तिच्या निधनानंतर तिचे अनेक सिनेमे रिलीज झाले होते. गलियों का बादशाह हा तिचा अखेरचा सिनेमा ठरला. तिच्या मृत्यूनंतर जवळपास तीन वर्षांनी हा सिनेमा रिलीज झाला होता.
7 / 11
मधुबाला - मधुबाला यांनी 23 फेबु्रवारी 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला होता. ज्वाला हा मधुबालाचा अखेरचा सिनेमा ठरला. 1971 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता.
8 / 11
मीना कुमारी - 31 मार्च 1972 रोजी मीनाकुमारीने जगाला अलविदा म्हटले. पाकिजाच्या रिलीजनंतर दोनच महिन्यांनी मीना कुमारीने जगाचा निरोप घेतला होता. पाकिजा सुपरहिट ठरला. गोमती के किनारे हा मीनाकुमारीचा अखेरचा सिनेमा. हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.
9 / 11
संजीव कुमार - संजीव कुमार यांच्या निधनानंतर त्यांचे एक दोन नाही तर तब्बल 10 सिनेमे रिलीज झाले होते. कत्ल, बात बन जाए, लव्ह अ‍ॅण्ड गॉड, दो वक्त की रोटी, नामुमकिन अशा अनेकांचा यात समावेश होता. प्रोफेसर की पडोसन हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. त्यांच्या मृत्यूनंतर 8 महिन्यांनी हा सिनेमा रिलीज झाला होता. संजीव कुमार यांनी निधनापूर्वी या सिनेमाचे 25 टक्के शूटींग पूर्ण केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर चित्रपटातून त्यांना रिप्लेस करण्याऐवजी कथा बदलण्यात आली आणि संजीव कुमार यांना सिनेमा सिनेमातून गायब करण्यात आले. म्हणजे त्यांचा आवाज ऐकू येत होता पण ते दिसत नव्हते. त्यांचे डबिंग सुदेश भोसले यांनी केले होते.
10 / 11
शम्मी कपूर - 14 आॅगस्ट 2011 रोजी शम्मी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. रॉकस्टार हा त्यांचा अखेरचा सिनेमा. या सिनेमात कपूर घराण्याचा वारस रणबीर कपूर लीड रोलमध्ये होता. शम्मी यांच्या निधनानंतर तीन महिन्यांनी हा सिनेमा रिलीज झाला होता आणि सुपरडुपर हिट ठरला होता.
11 / 11
राजेश खन्ना - राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा ते दोन सिनेमांत काम करत होते. जानलेवा ब्लॅक ब्लड व रियासत. यापैकी जानलेवा ब्लॅक ब्लड कधीच रिलीज झाला नाही. रियासत रिलीज झाला आणि तो राजेश खन्ना यांचा अखेरचा सिनेमा ठरला. या सिनेमात अनेक सीन्समध्ये राजेश खन्ना यांच्या बॉडी डबलचा वापर करण्यात आला होता. कारण शूटींगदरम्यान राजेश खन्ना यांची प्रकृती बिघडली होती.
टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमधुबालादिव्या भारती