Join us

Sushmit Sen Affairs: सुष्मिताने ललित मोदींच्या आधी यांना केलं होतं डेट, PAK क्रिकेटरचे नावही आहे सामिल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:20 PM

1 / 9
Sushmita Sen-Lalit Modi : अभिनेत्री सुष्मिता सेन ( Sushmita Sen ) ही सिनेमांपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. सुष्मिताच्या आयुष्यात बिझनेसमॅन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींची (Lalit Modi ) एन्ट्री झाली आहे. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) माजी चेअरमन ललित मोदी ( Lalit Modi) यांनी गुरुवारी मोठी बातमी दिली. ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेन ( Sushmita Sen) हिच्यासोबतच्या प्रेमाची कबुली दिली. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
ललित मोदींना डेट करण्यापूर्वी सुष्मिताने काही अभिनेता, दिग्दर्शकांना डेट केल्याचं सांगण्यात येतं. सुष्मिताच्या या अफेअर लिस्टमध्ये विवाहित लोकांचीही नावे आहेत. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
सुष्मिता वयाच्या १८-१९ व्या वर्षी विक्रम भट्टच्या प्रेमात पडली होती. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. इतकंच नाही तर, सुश्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्ट यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
5 / 9
सुष्मिता सेन आणि वसीम अक्रम यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. सुष्मिताची पहिली भेट पाकिस्तानी क्रिकेटर वसीमसोबत टीव्ही शो होस्ट करताना झाली होती. वसीम अक्रम आणि सुष्मिता सेन यांचे नाते फार काळ टिकले नाही.
6 / 9
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या लिंकअपच्या बातम्या अनेकदा मीडियात आल्या आहेत. 'कर्म और होली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले. त्यावेळी दोघेही एकत्र दिसले होते. दोघे जवळपास तीन वर्षे डेट करत होते.
7 / 9
2015 च्या सुमारास सुष्मिता मुंबईतील रेस्टॉरंटचा मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते पण 2017 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
8 / 9
बंटी सचदेवसोबत सुष्मिताच्या डेटिंगच्या बातम्याही आल्या होत्या. बंटी सचदेव हा टॅलेंट कंपनीचा मालक आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. त्यावेळी तो सुष्मिताचा मॅनेजरही होतो.
9 / 9
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या अफेअरच्या बातम्यांनी खूप चर्चेला उधाण आलं होतं. रोहमन वयाने सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे, काही महिन्यापूर्वीचे दोघांचे ब्रेकअप झाले. रोहमन आणि सुष्मिताचे अफेअर 2018 पासून सुरू झाले आणि 2021 पर्यंत चालले.
टॅग्स :सुश्मिता सेनविक्रम भटरणदीप हुडाललित मोदी