Sushmita Sen : सुष्मिता सेनने अजून लग्न का केलं नाही? अभिनेत्रीने सांगितलं कारण; म्हणाली, मला नवरा हवाय पण... By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:05 PM1 / 10सुष्मिता सेनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'ताली' या वेब सीरिजचं खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाला चांगली दाद मिळत आहे. यामध्ये सुष्मिता ट्रान्सजेंडर श्रीगौरी सावंत यांची भूमिका साकारताना दिसत आहे. सुष्मिता सेन अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. 2 / 10सुष्मिता सेन सिंगल मदर असली तरी तिने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत ज्यांची ती नीट काळजी घेते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीचे चाहते तिच्या लग्नाबाबत तिला अनेकदा प्रश्न विचारत असतात. याच दरम्यान, अद्याप लग्न का केलं नाही याचा खुलासा आता अभिनेत्रीने केला आहे.3 / 10अभिनेत्रीने आपल्या मुली रेनी आणि अलिशा यांची तिच्या लग्नाबद्दलच्या प्रतिक्रियेबद्दल खुलासा केला आणि जेव्हा तिच्या मनात लग्न करण्याचा विचार आला तेव्हा तिच्या मुलींची प्रतिक्रिया नेमकी कशी होती हे सांगितलं.4 / 10सुष्मिताने पर्सनल आयुष्य कधीही कोणापासून लपवून ठेवलं नाही. एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने खुलासा केला की तिला लग्न करायचं आहे, परंतु तिच्या मुलींनी तिची कल्पना पूर्णपणे नाकारली.5 / 10मुलींनी सांगितलं की आम्हाला कोणत्याही वडिलांची गरज नाही. सुष्मिता सेनने सिद्धार्थ कननसोबतच्या संवादात याचा खुलासा केला. जेव्हा सुष्मिताला विचारण्यात आले की, तिच्या मुलींना कधीच वडिलांची कमतरता भासत नाही का?6 / 10अभिनेत्री उत्तर देताना म्हणाली- 'अजिबात नाही. कारण, त्यांना वडिलांची गरज नाही. तुम्ही तीच गोष्ट मिस करता जी तुमच्याकडे आहे. जी गोष्ट तुमच्याकडे कधीच नव्हती, त्याची कशी काय तुम्हाला कमतरता भासेल'7 / 10'जेव्हा मी मुलींना मला लग्न करायचंय असं सांगते तेव्हा त्याची रिएक्शन अशी असते की, काय? पण का? आम्हाला वडील नको. मी त्यांना म्हणाले, पण मला नवरा हवा आहे आणि त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे यावरून आम्ही अनेकदा मस्करी करतो'8 / 10सुष्मिता सेन सिंगल मदर आहे.तिने 2000 मध्ये मुलगी रेनीला दत्तक घेतलं आणि त्यानंतर 2010 मध्ये अलीशाला दत्तक घेतलं आहे. सुष्मिताचे अनेक चाहते असून ती नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असते.9 / 10सुष्मिता सेनच्या 'ताली' या नवीन वेबसिरीजमध्ये ट्रान्सजेंडर श्रीगौरी सावंत यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. ज्या स्वत:साठी लढल्या आणि तसेच त्यांच्या संपूर्ण समाजासाठी नेहमीच उभ्या असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications